नवी दिल्ली
आगामी विधानसभा निवडणुकांचे (Assembly Elections) सर्व राजकीय पक्षाला वेध लागले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्ष स्थापन केला. शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. याचदरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निधी स्वीकारता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षनिधी स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे. शरद पवार यांच्या मागणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असे दोन गट आमने सामने उभे ठाकले. यानंतर निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीमध्ये शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांनी मिळालं.
यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह स्वीकारावे लागले. दरम्यान आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या या पक्षाला निधी स्वीकारण्यास परवानगी नव्हती. यासाठी पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती, अखेर आज ठाकरेंच्या पक्षाला निधी स्वीकारण्यास परवानगी मिळाली आहे.