10.2 C
New York

Sanjay Raut : लाडक्या बहिणीलाही 10 हजार रुपये द्यावे, राऊतांची मागणी

Published:

राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांना सरकारकडून हे रक्षाबंधनांचे गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे. या योजनेच्या घोषणेनंतर लागलीच सरकारकडून अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. पण या योजनेवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लाडक्या भावांना ज्याप्रमाणे सरकार 10 हजार रुपये देणार आहे, त्याचप्रमाणे सरकारने लाडक्या बहिणीलाही 10 हजार रुपये द्यावे, अशी मागणी राऊतांकडून करण्यात आली आहे. (Sanjay Raut demand that government should pay 10 thousand rupees to Mukhyamantri Ladki Bahin Yojana)

राज्य सरकारने घोषित केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही निवडणूक जुमला आहे. त्यामुळे या योजनेवरून विरोधकांनी राजकीय वातावरण तापवलेले आहे. त्यातच आता या योजनेबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये, तर पदवीधर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. मात्र आमची भूमिका आहे, की खरी गरज लाडक्या बहिणींना आहे, ती घर चालवते. घरात भाऊ बेरोजगार, नवरा बेरोजगार नोकऱ्या नाहीत, एअर इंडियाच्या कार्यालयासमोर दोन हजार लोडरच्या जागा भरण्यासाठी 25 हजार सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली, ही या महाराष्ट्राची स्थिती आहे. हे सगळे लाडके भाऊ आहेत, यांनाही 10 हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणीच्या खात्यातही 10 हजार रुपये टाका, अशी मागणी राऊतांकडून करण्यात आली आहे.

पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी केलं अटक

तर, 1500 रुपयांनी काय होणार आहे? मुख्यमंत्र्यांचे घर चालणार आहे का दीड हजार रुपयात? मुख्यमंत्र्यांच्या घरातील लाडकी बहीण, लाडकी सून यांचे घर 1500 रुपयात चालू शकेल का? लाडक्या बहिणीवर अन्याय कशाला? लाडक्या बहिणीलाही 10 हजार द्या आणि लाडक्या भावालाही. स्त्री पुरुष समानता महाराष्ट्रात दाखवून द्या, एवढीच आमची भूमिका आहे, असे यावेळी राऊतांकडून सांगण्यात आले. तसेच, महाराष्ट्रावर आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, लोकसभा निवडणूक हरल्यानंतर सरकारने नवनवीन योजना सुरू केल्या आहेत. लाडकी बहीण ही मध्य प्रदेशच्या योजनेची कॉपी आहे. आता लाडका भाऊही आणले आहे. पण 10 हजार रुपयांमध्ये बहिणींचे घर चालेल, शेतकरी आत्महत्या थांबतील, असे मत व्यक्त करत राऊतांनी सरकारकडे लाडकी बहीण योजनेतून 10 हजार रुपये देण्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img