8.9 C
New York

BMC : मुंबईच्या रस्त्यांवर तब्बल इतके खड्डे…

Published:

गेल्या काही दिवसांत मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे, (BMC) रस्त्यात खड्डे त्यामुळे पडू लागले आहेत. मुंबईतील सर्व रस्त्यांवर ८०२ खड्डे असल्याची माहिती सध्या पालिकेच्या सूत्रांनी दिली. खड्डे बुजविण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू असून पालिकेच्या चोवीस विभागांतील यंत्रणा अॅक्शन मोडवर आहे.

दरवर्षी पावसाने मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यामुळे चाळण होते. त्यामुळे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांतील खड्डा दिसल्यास भरा, असे आदेश दिले आहेत. चोवीस वॉर्डांतील सहाय्यक रस्ते अभियंत्यांना तैनात राहण्याच्या सूचना त्यासाठी पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. पालिकेच्या सूत्रांनी आतापर्यंत ५ हजार १९४ खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती दिली. रस्त्यांमध्ये ५ हजार ३९६ खड्डे होते. तातडीने ते चोवीस विभागातील यंत्रणेने बुजविले असल्याची माहिती पालिकेने दिली.

पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी केलं अटक

BMC खड्ड्यांसाठी मोबाईल अॅप

पालिकेने खड्ड्यांसाठी मोबाईल अॅप तयार केले असून याद्वारे खड्ड्यांचे छायाचित्र काढून ते पालिकेच्या संकेतस्थळावर टाकता येते. त्याद्वारे संबंधित वॉर्ड अधिकारी खड्डा तात्काळ बुजवितो. या मोबाईल अ‍ॅपमध्ये अक्षांश-रेखांशची नोंद आपोआप होते. त्यामुळे केवळ छायाचित्र काढले तरी जीपीएस व जीआयएसच्या मदतीने पालिकेला माहिती मिळते. छायाचित्र अ‍ॅपमध्ये टाकताना खड्ड्याजवळ उभे राहणे आवश्यक आहे. त्‍यामुळे खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर चाप बसेल, असे पालिका अधिकाऱ्यांना वाटते.BMC खड्ड्यांसाठी मोबाईल अॅप

खड्ड्यांवरील खर्च – २७३ कोटी
पावसामुळे पडलेले खड्डे – ५,३९६
बुजविलेले खड्डे – ५,१९४

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img