26.6 C
New York

Pravin Darekar : फडणवीस संयमी! त्यांना दुर्बल समजू नये दरेकरांचा जरांगेंना इशारा

Published:

मुंबई

मराठा समाजाने जो विश्वास जरांगे पाटलांवर (Manoj Jarange Patil) दाखवलाय त्यातून अहंकार येता कामा नये. ते आपल्या व समाजाच्या हिताचे नाही. कारण अहंकारातून ऱ्हास झाल्याची अनेक उदाहरणे पुढे आलीत. जरांगे यांचा द्वेष फक्त भाजपा (BJP)आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत. आम्ही हे खपवून घेणार नाही. देवेंद्र फडणवीसांची संयमी भुमिका म्हणजे त्यांची दुर्बलता समजू नये, असा इशाराच भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेत दरेकर म्हणाले की, जरांगेंनी ज्या दिवसापासून आंदोलन सुरू केले त्या दिवसापासून ते आजपर्यंत त्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू देवेंद्र फडणवीस हेच राहिलेले आहेत. जसे काय देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाला आडवे आहेत, अशा प्रकारचे चित्र, कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे तो राबविताहेत की काय अशी भावना झालीय. देवेंद्र फडणवीसांचे मराठा समाजासाठी योगदान नाही का? मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम फडणवीसांनी केले. ते हायकोर्टात टिकवले, सुप्रीम कोर्टात नाकारले गेले नाही. परंतु नंतर उद्धव ठाकरेंचे सरकार आल्यावर त्यांच्या निष्काळजीपणामुळे आरक्षण गेले. परंतु त्यांना जाब विचारला गेला नाही आणि तेच आता आम्ही फडणवीसांची बाजू घ्यायला गेलो तर आम्हाला फडणवीसांचा रोग झाल्याचे सांगतात. मग तुम्हाला फडणवीस द्वे्षाचा रोग झालाय का? असा सवालही दरेकरांनी जरांगे यांना केला.

दरेकर पुढे म्हणाले की, सरकार म्हणून जर आपण विचारत असाल तर शरद पवार या राज्यात अनेक वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वा, मार्गदर्शनाखाली अनेक सरकारं होती. त्यांना आम्ही ते मराठा म्हणून जाब विचारत नाही. उद्धव ठाकरे या राज्याचे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांना आम्ही जाब विचारला नाही. तेव्हा आंदोलन, आक्रमण केले अशा प्रकारची भुमिका नव्हती. तेव्हा प्रश्न नव्हते का?

हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. अठरा पगड जातींना एकत्रित घेऊन छत्रपतींनी राज्य केले. ओबीसी आरक्षणाला संविधानिक धक्का लागू शकतो का?ओबीसीतून आरक्षण द्या अशा प्रकारे शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते सांगू शकतात का? किंबहुना ओबीसीतून आरक्षण द्या हे ते लिहून देणार आहेत का? सरकार सकारात्मक असताना चर्चा सोडून वातावरण कलुशीत होऊन समाजासमाजात जातीय तेढ निर्माण होत नाही का? उद्या जर ही दरी मोठी झाली तर साधणार कशी की हा महाराष्ट्र जातीपातीत कुणाला दुभंगवायचा आहे का? याचेही उत्तर मागितले पाहिजे. जरांगे म्हणतात देवेंद्र फडणवीस रक्तरंजित इतिहास रचत आहेत. गृहमंत्री असूनही त्यांच्याविषयी जरांगे वाटेल ते बोलताहेत. असे असतानाही फडणवीस किंवा सरकार सहन करतेय फक्त शांतता राहावी म्हणून, संयमी भुमिका फडणवीस घेत असतील तर ती त्यांची दुर्बलता जरांगेंनी समजू नये. जरांगेंचे आंदोलन मराठ्यांच्या प्रश्नासाठी आहे की देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून कुणासाठी राजकीय अजेंडा आपण चालवताय. यामागे बोलावता धनी कोण आहे हेही महाराष्ट्रातील जनतेला समजायला लागले आहे.

दरेकर पुढे म्हणाले, जरांगे शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्यांची भुमिका का विचारत नाही की त्यांना देवेंद्र फडणवीस द्वेषाने कावीळ झालीय. सरकार विरोध हा आपला अजेंडा आहे, भाजपा विरोध हा आपला अजेंडा आहे की देवेंद्र फडणवीस विरोध हा आपला अजेंडा आहे, मराठ्यांचे प्रश्न समन्वयातून सोडवणे हा आपल्या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे हे जनतेसमोर स्पष्टपणे यायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर असतील या सगळ्यांवर टीका करायची. ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचेही दरेकर म्हणाले. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते सह्याद्रीवरील बैठकीला उपस्थित राहिले नाहीत त्यांना मराठा समाजाच्या हितासाठी समन्वयाची भुमिका घेत असताना आपण का गेला नाहीत अशी ढुंकूनही एका शब्दाने विचारणा केली नाही. यावेळी दरेकरांनी सरकारने मराठा समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या योजना, सवलतींची यादीही वाचून दाखवली.

दरेकर म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री मराठा समाजाविषयी संवेदनशील आहेत. त्यामुळे आपला सरकारवर विश्वास असायला हवा. सरकार माझ्या पायशी यावे, सरकारने नमावे यापेक्षा चर्चेच्या फेरीतून सरकारसोबत मंत्रालयात, सह्याद्रीवर येऊन चर्चेतून मार्ग काढावा तो मराठा समाज, महाराष्ट्राला अपेक्षित आहे. मराठा समाजासाठी सरकारने अनेक निर्णय घेतल्याचेही दरेकरांनी यावेळी नमूद केले. आम्ही लाठ्या, काठ्या, आंदोलने, रेल्वे अडवणे, रस्ता रोको, पोलिसांशी संघर्ष करून मार खाल्ला आहे. घाबरणारी औलाद आमची नाही. पण तुम्हाला तिथे या ही कुठली प्रवृत्ती. मी भाजपाचे मराठा समाजाचे सगळे आमदार घेऊन येतो. तुम्ही पहिले यात देवेंद्र फडणवीसांची काही चूक नाही, त्यांनी मराठा समाजाला अनेक गोष्टी दिल्या आहेत अशी जाहीर कबुली द्या मी एकटा काय ५० लोकं येतो. चर्चा मंत्रालयात, सह्याद्रीवर सरकारी दरबारी होते. आपण या. भूमिकेत संशय वाटेल असे होऊ नये हे तमाम मराठा समाज जो बोलत नाही त्याच्या मनात आहे ती भावना मी व्यक्त केल्याचे दरेकर यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img