18.7 C
New York

NEET-UG EXAM : नीट परीक्षेचा केंद्र व शहरनिहाय निकाल लावा सुप्रीम काेर्टाचे आदेश

Published:

नवी दिल्ली

नीट पेपर लीक (NEET-UG EXAM) प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे गुण वेबसाइटवर प्रकाशित करा, असा नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) आदेश दिला आहे. विद्यार्थ्यांची ओळख लपवावी, सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) 22 जुलै रोजी निर्णायक सुनावणी होणार आहे. पुनर्परीक्षा होईल की नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल ,पेपर ब्रीच झाला होता यात शंका नाही, अशी सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला निर्देश दिले की सर्व विद्यार्थ्यांचे निकाल शहरनिहाय आणि केंद्रनिहाय शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत ऑनलाइन अपलोड केले जावे. तसेच समुपदेशनाला सोमवारपर्यंत स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. समुपदेशन प्रक्रियेला विलंब होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने कथित पेपर लीक आणि गैरप्रकारांमुळे NEET-UG 2024 परीक्षा रद्द करण्याच्या याचिकांवर सुनावणी करताना हा आदेश दिला. एनटीएने सर्व उमेदवारांचे निकाल प्रसिद्ध न केल्याने केंद्रनिहाय मार्किंग पॅटर्न शोधू शकले नाहीत, अशी तक्रार याचिकाकर्त्यांनी केली होती. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img