21.9 C
New York

Mumbai-Goa Highway : मुंबई – गोवा महामार्गावर आज, उद्या ‘या’ वेळेत ब्लॉक

Published:

मुंबई

मुंबई गोवा महामार्ग (Mumbai-Goa Highway) आज 18 जुलै आणि उद्या चार तासांसाठी वाहतुकीसाठी बंद असणार आहे. कोलाड पुई येथील म्हैसदार पुलाच्या कामानिमित्त हा चार तासांचा ब्लॉक असून या कालावधीत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. कोलाड-रोहा-भिसेखिंड मार्गे पेण अशी वाहतूक वळवण्यात आली आहे. तर माणगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी वाकण – पाली – विळेभागाड या मार्गावरून माणगावकडे जायचे आहे. याखेरीज खोपोलीतून पाली-रवाळजे-निजामपूर-माणगावमार्गे मुंबई – गोवा महामार्गावरून पुढे जाता येणार आहे.

मुंबई-गोवा महामार्ग प्रचंड वर्दळीचा आहे. त्यामुळे अत्यंत चोख नियोजन करून चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून पर्यायी वाहतुकीचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील म्हैसदरा पुलावर गर्डर बसवण्याचे काम दोन दिवस केले जाणार आहे.

एक तपापासून मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते पळस्पे मार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. या मार्गाचे रूंदीकरण झाले पण कासूपासून इंदापूरपर्यंतच्या टप्प्यातील पुलांची कामे रखडली आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी आज आणि उद्या चार तासांचा ब्लॉक घेण्यात येत आहे. कोलाडजवळील पूई येथील पुलावर या दोन दिवसांत सहा मोठे गर्डर बसवण्याचे काम केले जाणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img