21 C
New York

ST Bus : महाराष्ट्राची ‘लालपरी’ आता ‘सीएनजी’वर धावणार!

Published:

डीझेलच्या वाढत्या किमती, तुटवडा आणि होणाऱ्या प्रदूषण यांमुळे राज्य परिवहन महामंडळाने (ST Bus) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीएनजीवर (कंप्रेस्ड नॅचुरल गॅस) आता पुणे विभागातील लालपरी (एसटी बस) हळूहळू धावणार आहेत. पुणे विभागातील शिरूर, राजगुरूनगर, बारामती आणि सासवड या चार आगारांमधील पहिल्या टप्प्यात १३२ लालपरी बसना सीएनजीत रुपांतरित करण्यात आले आहे. पुणे विभागात एकूण १४ आगार असून दररोज हजारो प्रवासी एसटीने प्रवास करतात.

एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहेत आणि त्यामुळेच महामंडळाने नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यावर भर दिला आहे. या जुन्या बस डीझेलवर चालतात आणि डीझेलच्या किमतीत होत असलेली वाढ ही महामंडळाच्या खर्चात वाढ करणारी ठरत आहे. यामुळे आर्थिक तोटा होत आहे.

पुणे एसटी विभागात सध्या जवळपास ८०० पेक्षा जास्त बसेस आहेत. त्यापैकी ७०० ते ७५० बस मार्गावर धावतात. यापैकी ५०० बस जुन्या झाल्या आहेत आणि त्या सर्व बस सीएनजीमध्ये रुपांतरित करण्यात येणार आहेत. यासाठी बारामती, शिरुर, सासवड आणि मंचर या चार आगारांमध्ये स्वतंत्र सीएनजी पंप उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम पुढील दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होईल. तसेच सासवड आणि शिरूर आगारांमध्ये खासगी वाहनांनाही सीएनजी पुरवठा करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि तसेच महामंडळाचा इंधनावरील खर्चही कमी होईल. यामुळे प्रवाशांना स्वस्त आणि स्वच्छ प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल.

लाडक्या बहिणीलाही 10 हजार रुपये द्यावे, राऊतांची मागणी

ST Bus स्वतंत्र सीएनजी पंप उभारणी

पुणे विभागात एकूण १४ आगार असून, दररोज हजारो प्रवासी एसटीने प्रवास करतात. शिक्षण, नोकरी, व्यवसाय यांसह पर्यटनासाठी प्रवाशांची हक्काची सेवा असलेली एसटी खर्‍या अर्थाने जीवनवाहिनी ठरत आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे महामंडळाने नव्याने इलेक्ट्रिक बस घेण्यावर जास्त भर दिल्याचे दिसून येत आहे.बारामती, शिरुर, सासवड आणि मंचर या चार आगारांत स्वतंत्र सीएनजी पंप उभारण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन- तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल, तसेच सासवड आणि शिरूर आगारांतही खासगी गाड्यांना सीएनजी विक्रीची सुविधा करण्यात येणार आहे. डीझेलची वाढती किंमत आणि प्रदूषणामुळे डीझेलवरील सर्व बसेसचे सीएनजीत रूपांतर करण्यात येणार आहे. सध्या चार आगारांतील १३२ बसेसचे सीएनजीत रूपांतर करण्यात आले आहे. – प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, पुणे विभाग

ST Bus आगारानुसार आकडेवारी…


शिरूर ५०
राजगुरूनगर ४२
बारामती ३०
सासवड १०
एकूण १३२

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img