22.9 C
New York

Jalna Accident : जालन्यात टॅक्सी विहिरीत कोसळली; 6 प्रवाशांचा मृत्यू

Published:

जालना

जालन्यातून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. जालन्यातील (Jalna Accident) राजूर रोड वरील तुपेवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. तुपेवाडी फाट्याजवळ चारचाकी विहिरीत कोसळली आहे. काळी पिवळी जीप विहिरीत कोसळल्याने सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गाडीत 12 लोक असण्याची शक्यता आहे. तर तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, जालन्यातून काही प्रवासी काळ्या- पिवळ्या जीपमधून राजूरच्या दिशेने जात होते. राजूरकडे जात असताना तुपेवाडी फाट्याजवळ हा अपघात झला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, आणखी काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गाडीतील लोकांची संख्या नेमकी किती होती, याचा तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच जालन्यातील चंदनझिरा पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे आणि अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img