निर्भयसिंह राणे
भारताचा फलंदाज ईशान किशनने (Ishan Kishan) त्याच्या 26व्या वाढदिसवासानिमित्त श्री समाधी मंदिर, शिर्डीला भेट दिली. किशनने इंस्टाग्रामवर त्याच्या भेटीची झलक शेअर केली आणि त्याच्या पोस्टला “श्रद्धा आणि सबुरी” असे कॅप्शन दिले. किशनसाठी हे वर्ष त्याच्या कराकीर्दीच्या दृष्टीने खडतर ठरले आहे. या वर्षीच्या सुरुवातीला, श्रेयस अय्यरसह, किशनला BCCI च्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते.
किशनने नुकतेच राष्ट्रीय संघात खेळत नसतानाही रणजी ट्रॉफीचे सामने वगळले. तो गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेतील भारतीय संघाचा भाग होत पण ‘वैय्यक्तिक कारणांमुळे’ तो बाहेर पडला होता. त्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतासाठी शेवटचा T20 सामान खेळला होता, ज्यामध्ये झारखंडचे रणजी सामने खेळले होते. कराराच्या यादीतून वगळल्यानंतर, किशनने 18व्या DY पाटील T20 कप 2024 मध्ये रूट मोबाईल लिमिटेड विरुद्ध भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून खेळताना स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
परतल्यावर किशनने DY पाटील विद्यापीठाच्या मैदानावर सायन मोंडलच्या चेंडूवर सुमित ढेकळेला त्रिफळाचित करत एक बाद ठरविण्याची भूमिका बजावली. बॅटने त्याने 12 चेंडूत टन चौकार आणि एका षटकारासह 19 धावांची खेळी केली. ईशान किशनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियासाठी खेळाला. 14 सामन्यांमध्ये, ईशानने 148.84 च्या स्ट्राईक रेटने 22.86 च्या सरासरीने 320 धाव केल्या.
Luka Modric – मॉड्रिचने रियल मॅड्रिडशी 2025 पर्यंत करार वाढवला
T20I फॉरमॅटमध्ये, किशनने 32 सामने खेळले आहेत आणि 25.7 च्या सरासरीने 124.4 च्या सरासरीने 796 धावा केल्या आहेत.
एकदिवसीय फॉरमॅटमध्ये, त्याने 27 सामने खेळले आहेत आणि 102.2 च्या स्ट्राईक रेटने 42.4 च्या सरासरीने 933 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे.
रेड-बॉल क्रिकेटमध्ये, त्याने 85.7 च्या स्ट्राईक रेटने 78 धाव आणि 78.0 च्या सरासरीने दोन सामने खेळले आहेत.