23.1 C
New York

Sanjay Raut : भुजबळ फिरता रंगमंच तर, पवार मोठे…; राऊत म्हणले…

Published:

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) चर्चेत आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांची अचानक भेट घेतल्याने त्यांच्याबद्दल राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. यातच आता शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत तर छगन भुजबळ फिरत्या रंगमंचावरील कलाकार आहेत अशी टीका शिवसेना नेते (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या लाडका भाऊ योजनेवर देखील टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहे तर छगन भुजबळ फिरत्या रंगमंचावरील कलाकार आहेत. भुजबळ हे खूप मोठे कलाकार आहे, त्यांनी चित्रपटात देखील काम केलं आहे. त्यामुळे ते आपलं रंग आणि रूप बदलून एक नाट्य करण्यात माहीर आहे. शरद पावर यांच्या भेटीला ते का गेले आणि कशासाठी गेले हे सर्वांना माहिती आहे. पण शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत. राज्याचे आणि देशाच्या राजकारणात त्यांना एक प्रतिष्ठा आहे. महाराष्ट्रात एक खुला रंगमंच असल्याने ते फिरत रहातात आणि छगन भुजबळ सारखे नेते ते फिरत्या रंगमंचाचे कलाकार आहे. असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut दहा दहा हजार रुपये द्या

तर यावेळी राज्य सरकारने जाहीर केलेली लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेवर देखील संजय राऊत यांनी टीका केली. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल शरद पवार यांनी सांगतिले की, लोकसभा निवडणूक हरल्यानंतर सरकारला लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका छोटा भाऊ, लाडका मोठा भाऊ हे सगळं आठवत आहे. या योजनांवर विरोधकांनी टीका केलेली नाही, विरोधक सरकारी पैशातून एकंदरीत जे राजकारण सुरू आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे असं संजय राऊत म्हणाले.’

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, सरकारने आणलेल्या योजनेत लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपये आणि लाडक्या भावांना 6000, पदवीधरांना दहा हजार रुपये देण्यात येत आहे मात्र खरी गरज तर लाडक्या बहिणींना आहे अशी आमची भूमिका आहे. लाडकी बहीण घर चालवते,त्यांच्या घरात नवरा, भाऊ बेरोजगार आहे त्यांना नोकऱ्या नाही. आज एअर इंडियाच्या 2000 लोडरच्या जागा भरण्यासाठी 25000 सुशिक्षित तरुणांची झुंबड एअर इंडियाच्या कार्यालयासमोर उडाली आहे. हे सगळे लाडके भाऊ आहे यांना देखील दहा दहा हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात सुद्धा दहा हजार रुपये जमा करा फक्त पंधराशे रुपयांनी काय होणार? पंधराशे रुपयात मुख्यमंत्र्यांचे घर चालेल का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या घरातली लाडकी बहीण किंवा सून पंधराशे रुपयात घर चालवू शकते का? मग लाडक्या बहिणीवर अन्याय का? अशी आमची भूमिका आहे. असेही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होणार

तर आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होणार असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत आम्हाला 10 जागा देखील मिळणार नाही असं महायुतीमधील नेते म्हणत होते मात्र आम्ही 31 जागा जिंकल्या तर चार जागा आम्ही फार कमी मतांनी हरलो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img