महाराष्ट्रातील (Maharashtra News) नारीशक्तीच्या पंखाला बळ देण्यासाठी राज्य सरकारनं (State Govt) लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली. या लाभाचा पहिला टप्पा बहिणींच्या खात्यात येत्या रक्षाबंधनाला जमा होणार आहे. आता लाडक्या भावांसाठीही त्याचसोबत राज्य सरकारनं (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024) मोठी घोषणा केली आहे. मतांच्या पिकासाठी सरकारकडून आगामी विधानसभा निवडणुका (Assembly Elections) लक्षात घेऊनयोजनांची पेरणी सुरू झाली आहे.
लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) जाहीर केल्यानंतर लाडक्या भावांसाठी काय? असा सवाल विरोधकांनी विचारला होता. आता सरकारनं लाडका भाऊ योजना त्यालाच उत्तर म्हणून जाहीर केली आहे. लाडक्या भावाकडेही आमचं लक्ष आहे, म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातून या योजनेचा फराळ महाराष्ट्राला दिला. त्याचप्रमाणे, लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनांची घोषणा करण्यासोबतच, मातंग समाजासाठीही बार्टीच्या धरतीवर आर्टी अर्थात अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
Maharashtra News योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची अट काय?
उमेदवाराचं वय 18 ते 35 वर्ष असणं आवश्यक
कोणाला किती रुपये मिळणार?
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6 हजार रुपये स्टायपेंड
डिप्लोमा झालेल्या तरूणाला दरमहा 8 हजार रुपये स्टायपेंड
पदवीधर तरूणाला दरमहा 10 हजार रुपये स्टायपेंड
योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी-शर्थी काय?
तरूणांना कारखान्यात वर्षभर अप्रेंटीसशिप करावी लागणार
अप्रेंटीसशिपमधून कार्यानुभव,स्कील्ड मॅनपॉवरसाठी सरकारची गुंतवणूक
ज्या कारखान्यात काम करेल,तिथे स्टायपेंडचे पैसे सरकार भरणार
राज्य सरकार देणार बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी
Maharashtra News प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढं काय?
युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनीकडून त्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. संबंधित आस्थापना अथवा कंपनीला युवकाचं काम योग्य वाटल्यास त्यांना तिथं नोकरी देऊ शकतात. विद्या वेतनाशिवाय अधिकची रक्कम संंबंधित आस्थापना याशिवाय राज्य सरकार देत असलेल्या युवकांना देऊ शकतात. राज्य सरकारकडून युवकांना देण्यात येणारा स्टायपेंड दरमहा दिला जाणार आहे. हा स्टायपेंड सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मिळेल. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा लाभ संबंधित युवक फक्त एकदाच घेऊ शकतो.
Maharashtra News मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्त यांच्याकडून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी व्यवस्था येत्या काही दिवसात तयार केली जाईल. त्यानुसार बारावी, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या युवकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.