2.5 C
New York

Eknath Shinde : शिवसेनेच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

Published:

मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुक (Assembly Elections) अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यादरम्यान राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागांवर विजय मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत (Shiv Sena) महत्त्वाची रणनीती आखली जात आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिंदे गटाची बैठक सुरु आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते, उपनेते मंत्री,आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत विधानसभेची पूर्वतयारी आणि रणनीती आखली जात आहे. एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

या आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाकडून लिमिटेड जागांवर लक्ष केंद्रित करण्याची योजनाआखण्यात आली आहे. विधानसभेसाठी 100 जागांची तयारी शिंदे गटाकडून सुरू करण्यात आली आहे. आज वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक पार पडली, ज्यामध्ये विधानसभेच्या फक्त 100 जागांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांनी राज्यातील शंभर जागा निवडल्या असून त्या जागांवर जोमाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या जागांवर निरीक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. महिला आघाडीसंदर्भातील पदे देखील भरण्यास सांगण्यात आले आहे.

सरकारी योजना सगळीकडे प्रसारित करा. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जारी केलेल्या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे. सदस्य नोंदणीवर भर देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडीपदाची देखील नेमणूक करा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही जोरदार हालचाली घडत आहेत. महाविकास आघाडीच्या गोटातही जागावाटपासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. तसेच महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्या आपापल्या पातळीवर वैयक्तिक बैठकाही पार पडत आहेत. ठाकरे गटाची नुकतीच दोन दिवसांपूर्वी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकांमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीत समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. यानुसार मविआत जागावाटपाचा 96-96-96 चा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img