23.1 C
New York

Pune : पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Published:

पुण्यातील कल्याणीनगर येथील ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणाचे (Pune) पडसाद अद्याप उमटत आहे. या अपघाता अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवून बाईकस्वारांना उडवले, त्यात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यात पुन्हा एकदा असाच एक अपघात घडला आहे. शहरात आणखी एक भयंकर अपघात झाल्याची घटना समोर आली असून, त्याचा एक भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो ट्रकला भरधाव वेगाने आलेल्या एसयूव्हीने धडक दिली, ड्रायव्हर आणि क्लीनर ज्यामध्ये जखमी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील एका नेत्याचा मुलगा ही कार चालवत होता.

मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. शरद पवार यांच्या पक्षातील नेते, बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ ही कार चालवत होता, आणि अपघातावेळी तो दारूच्या नशेत होता. व्हिडीओ सोशल मीडियावर या अपघाताचा व्हायरल झाला आहे. एक ट्रक सुनसान रस्त्यावरून जात असताना समोरून भरधाव वेगाने एक कार आली. टेम्पो चालकाने गाडी वळवण्याचाही, बाजूला घेण्याचाही प्रयत्न केला, पण तेवढ्यात कारने पुढच्या बाजूने जोरदार धडक दिली. हा अपघाता एवढा भीषण होता की टेम्पो आणि ती कार दोघांच्याही पुढच्या भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. या अपघातात ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लीनर दोघेही बरेच जखमी झाले. दोन्ही वाहनांच्या धडकेमुळे कोंबड्या टेम्पोतून रस्त्यावर पडल्याचंही व्हिडिओमध्ये दिसतंय. या अपघाताप्रकरणी आरोपी सौरभ गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 महाराष्ट्राची ‘लालपरी’ आता ‘सीएनजी’वर धावणार!

पुण्यातील पोर्श कार अपघाताच्या सुमारे दोन महिन्यांनंतर हा अपघाता झाला आहे. तर गेल्या आठवड्यात मुंबईती वरळी येथेही एका बीएमडब्ल्यू कारने स्कूटीवरून जाणाऱ्या दोघांना धडक दिली. त्यानंतर खाली पडलेल्या महिलेला चिरडले आणि ती कारखाली अडकल्यानंतर सुमारे दीड किलोमीटर तिला तसेच फरपटत नेले. कावेरी नाखवा या महिलेचा अखेर त्यामध्ये मृत्यू झाला. शिवसेना शिंदे गटाचे (माजी) उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img