10.6 C
New York

Coriander Water Benefits: दररोज प्या एक ग्लास धण्याचं पाणी तर शरीराला मिळतील ‘हे’ ५ फायदे

Published:

Coriander Water Benefits: घरी आपल्या किचनमध्ये आपल्या आरोग्याला चांगलं ठेवण्यासाठी अनेक गोष्टी असतात. पण त्याबद्धल अनेकांना माहिती नसतं. अशी एक गोष्ट म्हणजे धणे. (Coriander Seeds) वेगवेगळ्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी धण्याचा वापर हमखास केला जातो. पण धण्यामुळे आरोग्याला होणारे फायदे अनेकांना माहिती नसतात. धण्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, फायबर, मिनरल्स, पोटॅशिअम, आणि अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जर तुम्ही पाण्यामध्ये धणे भिजवून हे पाणी प्याल तर तुम्हाला वजन कमी करण्याबरोबरच इतरही बरेच फायदे मिळतील, मग चला तर जाणून घेऊया धण्याचं पाणी पिण्याचे फायदे…

शरीरातील सूज कमी होण्यास मदत
Coriander Water Benefits: धण्याच्या बियांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स जास्त प्रमाणात असतात जसं की, व्हिटॅमिन सी, फ्लावोलॉयड्स, बीटा कॅरोटीन जे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. शरीरामधील आतील सूजही कमी करण्यास धण्याचं पाणी मदत करते.

पचनक्रिया चांगली राहते
सकाळी रोज उठून तुम्ही धण्याचं पाणी प्याल तर पचन तंत्र चांगलं राहण्यात मदत होते. धण्याच्या बियांमध्ये अ‍ॅक्टिव एंझाइम्स असतात जे पचन क्रिया सुधारण्यास मदत करतात. धण्याच्या पाण्याचं सेवन केल्याने पोटासंबंधी समस्या होतात जसं की, अ‍ॅसिडिटी, गॅस, आणि पोटदुखीही दूर होते.

डार्क चॉकलेट खाल्ल्याने ‘या’ आजारांवर होईल मात

वजन नियंत्रणात राहतं
धण्याचं पाणी सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहतं. यात फायबर भरपूर प्रमाणात असतं. ज्याने वजन कमी करण्यास मदत होते. आणि अन्न पचनास मदत होते, व पोट जास्त वेळ भरून राहतं.

हृदयासाठी फायदेशीर
धण्यामध्ये पोटॅशिअम आणि फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे पाणी प्यायल्याने स्ट्रोक, हार्ट अटॅक, सारख्या समस्यांचा धोका कमी होतो.

विषारी पदार्थ बाहेर टाकतील
किडनी साफ होण्यास धण्यांच्या पाण्याची मदत मिळते, लघवीसंबंधी समस्या दूर होतात. तसंच शरीरातले विषारी पदार्थ लघवीच्या माध्यमातून बाहेर पडतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img