19.7 C
New York

Bigg Boss OTT3: घरात एंट्री घेताच मोडला ‘हा’ महत्वाचा नियम; पहिल्याच दिवशी घरचा…

Published:

Bigg Boss OTT3: ‘बिग बॉस ओटीटीचे तिसरा’ (Bigg Boss OTT3) सिझन सध्या चांगलाच गाजतोय. अनिल कपूर यांचं सूत्रसंचालन प्रेक्षकांच्या पसंतीस पडलंय. अशातच बिग बॉस ओटीटी ३ हा पर्व कधी स्पर्धकाच्या घरात झालेल्या वादांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत येतो. मात्र, आता एका स्पर्धकामुळे हा शो अजूनच चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. चंद्रिका दीक्षित म्हणजेच दिल्लीची ‘वडापाव गर्ल’ ची एक्सिट झाली असून, अदनान शेखने घरात एंट्री केली आहे. मात्र, अदनानने घरात एंट्री घेताच बिग बॉसच्या घरातले नियम मोडल्याने त्याला पहिल्याच दिवशी घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

अदनान शेखने मोडला हा नियम
Bigg Boss OTT3: बिग बॉसच्या घरात पाय ठेवण्याआधी स्पर्धकांना काही नियम असतात. आणि ह्या नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांना शिक्षा भोगावी लागते. बिग बॉसच्या घराबाहेरील ज्या घडामोडी असतात त्या नवीन आलेल्या सदस्याने घरातील जुन्या सदस्यना सांगू नयेत, हा असा नियम आहे. मात्र, वाइल्ड कार्ड स्पर्धक असलेला अदनान शेखने घरात आल्याबरोबरच नवीन प्रदर्शित झालेले चित्रपट आणि टी-२० विश्वचषकामध्ये झालेला भारताचा विजय यांच्याविषयी माहिती सांगण्यास सुरुवात केली. अदनानला बिग बॉसने वारंवार सूचना देऊनदेखील अदनानने या सव गोष्टी सुरूच ठेवल्या. त्यामुळे अदनानला बिग बॉसने घरातला महत्वाचा नियम मोडल्याबद्धल पहिल्याच दिवशी घरचा रास्ता दाखवला आहे. बिग बॉसने म्हंटल, तुला हा गेम खेळण्यापेक्षा बाहेरच्या गोष्टी सांगण्यात जास्त मज्जा येत आहे. वर्तमान पत्र तुझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काम करेल. त्यामुळे तू याच क्षणी घराच्या मुख्य प्रवेशाद्वारे बाहेर पड.” बिग बॉसने असं सुनावल्यांनतर अदनानने बिग बॉसची माफी मागितली; पण त्याचा काहीच उपयोग न होता, अदनान शेखला आल्या पावली बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं लागलं असल्याचं समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.

गणपतीच्या मुर्तीसोबत विचित्र पोज दिल्याने किम कार्दशियन ट्रोल, नेटकरी भडकले

Bigg Boss OTT3: बिग बॉस ओटीटीचे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. काही दिवसांआधी अरमान मलिकने विशाल पांडेच्या कानशिलात लगावली होती त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. बाहेरून बऱ्याच टीव्ही कलाकारांनी आणि बिग बॉसच्या आधीच्या सीझनमधल्या सदस्यांनी अरमान मलिकला यासाठी शिक्षा व्हायला हवी आणि घरातून बाहेर काढण्याची मागणी सुद्धा केली गेली. मात्र, बिग बॉसने कोणतीच ऍक्शन घेतली नाही त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लाईव्ह फिडमध्ये लव कटारिया जिथे बसलेला त्याच्या पाठीमागे साप आढळल्याचं पाहायला मिळालं होत. त्यानंतर घरातल्या सदस्यांना नेटकऱ्यांनी सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण केला होता. आता या बॉग बॉसच्या तिसऱ्या पर्वामध्ये कोण प्रेक्षकांची मन जिंकून ट्रॉफी चा हकदार असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img