उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) चंदिगढ डीब्रूगड एक्स्प्रेस ट्रेनचा अपघात झाला आहे. उत्तर प्रदेशच्या गोंडामधे ट्रेनचे डबे रुळावरून घसरले. चंदिगढवरून गोरखपुरला (Dibrugarh Express Train Derail) ही जात होती. या घटनेत कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोंडा येथे चंदीगड एक्स्प्रेसच्या 10 ते 12 बोगी पटरीवरुन घसरल्या आहेत. चंदीगढवरुन निघालेल्या एक्स्प्रेस ट्रेनचे गोंडा मनकापूर स्टेशनजवळ (Gonda-Mankapur) डब्बे रुळावरुन घसरल्याचं समोर आले आहे.
डबे रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण झालं. या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त मदत वाहन घटनास्थळी रवाना झालेय. रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात अद्याप मृतांची कोणतीही बातमी समोर आलेली नाही. पण गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये चनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.