19.7 C
New York

Ashi Hi Banwa Banwi Marathi Movie: ‘अशी ही बनवाबनवी’चा सीक्वेल येणार परत? सचिन पिळगावकर म्हणाले, “लक्ष्याशिवाय…”

Published:

Ashi Hi Banwa Banwi Marathi Movie: मराठी सिनेसृष्टीतील ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट एव्हरग्रीन चित्रपट म्हणून ओळखला जातो. २३ सप्टेंबर १९८८ मध्ये हा चित्रपत प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सदाबहार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अफलातून कमाई करत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं घर निर्माण केलं होत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केलं होत. सचिन पिळगावकरसह या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सिद्धार्थ रे या अभिनेत्यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

Ashi Hi Banwa Banwi Marathi Movie: आता मराठी सिनेसृष्टीत ‘झपाटलेला ३’ ‘नवरा माझा नवसाचा २’ या सीक्वेल चित्रपटांची लाट आलेली असताना ‘अशी ही बनवाबनवी’चा दुसरा भाग सचिन पिळगावकर बनवणार आहेत का याबद्धल त्यांना नेहमीच विचारलं जातं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘अशी ही बनवाबनवी’चा दुसरा भाग बनवणं शक्य नाही असं सचिन पिळगावकर यांनी सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अगदी कौतुकास्पद! संस्कृती बालगुडे कॅन्सर पेशंटला करणार केस दान;

Ashi Hi Banwa Banwi Marathi Movie: सचिन पिळगावकर यांनी म्हंटल, “अशी ही बनवाबनवी’च्या दुसरा भाग बनवणं शक्य नाही कारण, आता लक्ष्या नाही आहे. त्याच्याशिवाय मी हा चित्रपट बनवू शकत नाही. लक्ष्या, सुधीर जोशी, सुशांत ( सिद्धार्थ रे ), लेखक वसंत सबनीस, गीतकार शांताराम नांदगावकर, संगीतकार अरुण पौडवाल, ही लोक आता आपल्यासोबत नाही आहेत अशी अनेक लोकं आहेत ज्यांचं या चित्रपटासाठी खूप मोठं योगदान होत. आणि आता तीच लोकं नाहीत तर, मी कसं त्या चित्रपटाला पुढे नेणार… त्यामुळेच या चित्रपटाला हात न लावणं तेच चांगलं आहे.

“काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या खूप पलीकडच्या असतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. हा चित्रपट मी बनवला आहे असं मी कधीच बोलू शकत नाही कारण तो चित्रपट आम्ही सगळ्या कलाकारांनी एकत्र येऊन बनवला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी फार मोठं केलं आहे.” असं सचिन पिळगावकर यांनी मनातल्या भावना व्यक्त केल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img