21 C
New York

Gautam Gambhir : ‘मी तुमच्यापैकीच एक’ असं का म्हणाले भारताचे मुख्य प्रशिक्षक ?

Published:

निर्भयसिंह राणे

गौतम गंभीरने (Gautam Gambhir) सोशल मीडियावर एक विडिओ पोस्ट केला ज्यामध्ये त्याने दिल्लीनंतर त्याचे दुसरे घर असलेल्या कोलकातातील लोकांसाठी आपले प्रेम दर्शवले. कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) महान खेळाडू गौतम गंभीरने या महिन्याच्या अखेरीस भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून नवीन भूमिकेत पॉल ठेवताना फ्रॅन्चायझी आणि लाडक्या ‘सिटी ऑफ जॉय’ ला भावनिक निरोप दिला.

गंभीरने सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात कोलकात्यातील लोकांबद्दल आपले प्रेम वयात केले आहे, ज्याला तो दिल्लीनंतर त्याचे दुसरे घर मानतो. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी, प्रतिष्ठित ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता.

Champions Trophy : डेव्हिड वॉर्नर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार ? सेलेक्टरने सांगितले सत्य

या आठवड्याच्या सुरुवातीला भारताचे पुढील मुख्य प्रशिक्षक म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले, गंभीरची पहिली नियुक्ती श्रीलंकेत 26 जुलैपासून सुरु होणारी तीन T20 नि तीन एकदिवसीय मालिका असणारी व्हाईट बॉल मालिका असेल. गंभीरच्या राष्ट्रीय भूमिकेत पदार्पण होण्यापूर्वी, त्याने KKR ला IPL 2024 चे विजेतेपद मिळवून देण्यासाठी, कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाचे मार्गदर्शन करून लाखो लोकांचा लोकांची स्वप्ने पूर्ण केली. 2012 आणि 2014 मध्ये कर्णधार म्हणून त्याच्या मागील विजयानंतर या विजयाने KKR सोबत तिसरे विजेतेपद मिळवले.

फ्रँचायझी पुढे नेण्यासाठी दीर्घकालीन दृष्टिकोनातून गंभीर KKR मध्ये परतला होता, परंतु भारतप्रती त्याच्या वाचनबद्धतेमुळे त्याला BCCI कडून ऑफर मिळाल्यानंतर गौतमने राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षक बनण्याचा निर्णय घेतला. त्याच्या नुकत्याच झालेल्या आयपीएल विजेतेपदामुळे तो ह्या जॉबसाठी आघाडीचा उमेदवार होता, जो त्याने जुलै रोजी मिळवला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img