19.7 C
New York

Devendra Fadnavis : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर ढगात भरकटलं अन्…

Published:

मुंबई

महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गडचिरोलीतील एका स्टील फॅक्टरीच्या भूमिपूजन सोहळाला नागपूर (Nagpur) ते गडचिरोली (Gadchiroli) असा हेलिकॉप्टरने (Helicopter) जात असताना मोठी दुर्घटना टळली आहे. हेलिकॅाप्टर पायलटने प्रसंगावधान दाखवत हेलिकॅाप्टर जमीनीवर उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या गडचिरोलीतील सर्वात मोठ्या स्टील प्लांटचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाकरिता नागपूरहून हेलिकॉप्टरने गडचिरोलीला जाण्याकरिता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योगमंत्री उदय सामंत प्रवास करत होते खराब हवामानामुळे हेलिकॅाप्टर पावसाळी ढगात भरकटले. खराब हवामानामुळे दृष्यमानता अत्यंत कमी झाली होती. हेलिकॅाप्टर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॅाप्टर जमीनीवर उतरवले. त्यामुळे पुढील मोठी दूर्घटना टळली.

राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे नागपूरहून गडचिरोली दौऱ्यावर जात होते. या प्रवासादरम्यान त्यांचे हेलिकॅाप्टर खराब वातावरणामुळे ढगात भरकटले. उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॅाप्टर ढगात भरकटल्याची माहिती समोर येताच प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img