4 C
New York

Wagh Nakhe : शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं मुंबईत दाखल

Published:

मुंबई

शिवरायांनी ज्या वाघनखांच्या साहाय्याने स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध केला. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची ती वाघनखं (Wagh Nakhe) आता महाराष्ट्रात (Mumbai) दाखल झाली आहेत. ही वाघनखं साताऱ्याला नेण्यात येतील आणि इथे या वाघनखाचा एक कार्यक्रमही होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं लंडनहून मुंबईत दाखल झाली आहेत. ही वाघनखं साताऱ्याला नेण्यात येतील आणि इथे या वाघनखाचा एक कार्यक्रमही होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढण्यासाठी जी वाघनखं वापरली ती हीच वाघनखं आहेत असे सांगितले जात आहे. ही वाघनख जेव्हा महाराष्ट्रात येणार अशी माहिती जेव्हा राज्य सरकारने दिली. तेव्हा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी ही वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरली नव्हती असा दावा केला होता. त्यावरून वादही झाला होता. तेव्हा सुधीर मुनंगटीवर यांनी ही वाघनखं शिवाजी महाराजांशी संबंधित आहे असे उत्तर दिले होते.

इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी ती वाघनखं शिवरायांची नाहीत, असा दावा केला होता. सावंत यांनी म्हटल्यानुसार, ‘शिवरायांनी अफजलखानाचा वध करताना जे शस्त्र वापरलं ते कुठे आहे याची स्पष्टता 1919 पर्यंत होती. कारण हे शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. पण आता जी वाघनखं आणली जात आहेत, ती शिवरायांनी अफजलखान वधाच्या वेळी वापरलेली वाघनखं नाहीत. जर 1919 पर्यंत ही वाघनखं साताऱ्यात होती, अशा नोंदी आहेत. तर मग 1919 च्या आधी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयामध्ये जमा झालेलं वाघनख हे शिवरायांचं असू शकत नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img