2024 टी -20 विश्वचषकानंतर (2024 T20 World Cup) भारतीय संघाचा (Team India) टी-20 कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्ती घेतल्यानंतर या फॉरमॅटमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचे नेतृत्व करणार अशी चर्चा होत होती हार्दिककडे श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेपासून भारतीय संघाचे नेतृत्व येणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार बीसीसीआय (BCCI) हार्दिक पांड्याला मोठा धक्का देणार असल्याची तयारी करत आहे.
माहितीनुसार, श्रीलंकेविरुद्ध 27 जुलैपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) जाणार आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
डेव्हिड वॉर्नर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार ? सेलेक्टरने सांगितले सत्य
मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि गंभीर 2026 टी-20 वर्ल्ड कपपर्यंत सूर्याला या फॉरमॅटचा कर्णधार म्हणून पाहत असल्याची देखील चर्चा होत आहे. दुखापतींनी त्रस्त असलेल्या हार्दिक पंड्या पुढील दोन वर्ष किती सामने खेळणार याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आणि 2023 विश्वचषकानंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या मालिकेत सूर्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तर दुसरीकडे 2026 टी-20 विश्वचषकापर्यंत शुभमन गिलला टी-20 मध्ये उपकर्णधार बनवले जाऊ शकते.
नुकतंच झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या पाच टी -20 सामन्यांच्या मालिकेसाठी शुभमन गिलला भारतीय संघाचे नेतुत्व देण्यात आले होते. ही मालिका भारतीय संघाने 4-1 ने जिंकली होती. श्रीलंकेविरुद्ध 27 जुलैपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे. माहितीनुसार, टी-20 मालिकेसाठी सूर्याकुमार यादव आणि एकदिवसीय मालिकेसाठी शुभमन गिल किंवा केएल राहुल यांना संघाचे नेतृत्व दिले जाऊ शकते.