लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता लवकरच राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशी आहे. या योजनेच्या नावाशी मिळत्याजुळत्या अशा वेळेतच महिलांना आता या योजनेचा पहिला लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. तसेच रक्षाबंधन सणाच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांकडून आपल्या लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून या योजनेच्या माध्यमातील पहिला आणि दुसऱ्या महिन्याचे मिळून पैसे दिले जाणार आहेत, अशी माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.
अजित पवार यांच्या माहितीनुसार, राज्यातील महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. याच दिवशी राज्यभरातील लाखो महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 3 हजार रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे राज्यातील गरीब कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम रक्षाबंधनाला लाभार्थी महिलांना मिळणार आहे. राज्यसरकारकडून महिलांना राखीची भेट दिली जाणार आहे.
Ajit Pawar अजित पवारांचा शेतकऱ्यांना शब्द
माझ्या शेतकऱ्यांना वीज मोफत देत आहे. शेतकऱ्यांनो आता चांगले धान्य पिकवा. एक रुपयात पीकविमाही देत आहोत. एकरी पाच हजार रुपये कापूस आणि सोयाबीनला दिले आहेत. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा काळजी करू नका, असा शब्दही अजित पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. विकास आणि गरीबीचा विचार करताना दूध उत्पादक शेतकऱ्यांचाही विचार केला.असंदेखील अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो ‘या’ दिवशी येणार मुंबईकरांच्या सेवेत
Ajit Pawar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष काय?
महाराष्ट्र रहिवासी
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
अपात्र कोण असेल?
2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
घरात कोणी Tax भरत असेल तर
कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून)
Ajit Pawar कोणती कागदपत्रं लागणार?
आधारकार्ड
रेशनकार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
बँक पासबुक
अर्जदाराचा फोटो
अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
लग्नाचे प्रमाणपत्र
योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपवर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलं जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.