19.7 C
New York

Sri Lanka : धक्कादायक! श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची गोळ्या झाडून हत्या

Published:

निर्भयसिंह राणे

वयाच्या 20 व्य वर्षी क्रिकेट सोडण्यापूर्वी धम्मिका निरोशनाची (Dhammika Niroshana) युवा स्तरावर श्रीलंकेकडून (Sri Lanka) खेळाला होता. माजी अंडर 19 कर्णधार धम्मिका निरोशनाची मंगळवारी, 16 जुलै रोजी त्याच्या घरी त्याच्या पत्नी आणि मुलांसमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना निरोशनाच्या अंबालागोंडा येथील निवासस्थानी घडली. त्याच्यावर गोळी झाडली तेव्हा तो त्याच्या घरासमोरच उभा होता.

हा गुन्हा घडला तेव्हा धम्मिका निरोशनाची पत्नी आणि मुले घरी उपस्थित होते, असे स्थानिक अहवालात म्हटले आहे. श्रीलंकेच्या माजी U19 कर्णधार त्याच्या कांडा मावाथा निवासस्थानी त्याच्या जोडीदारासह आणि मुलांसह असताना 2 बाइक्सवरून आलेल्या पुरुषांनी 12-बोअर रायफलने गोळ्या झाडल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धम्मिका निरोशनाच्या निवासस्थानाकाडे धाव घेतली आणि पुढील तपासासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अहवालानुसार निरोशनावर गोळीबार करणाऱ्या संशयितांची अद्याप ओळख पटलेली नाही.

Gautam Gambhir : ‘मी तुमच्यापैकीच एक’ असं का म्हणाले भारताचे मुख्य प्रशिक्षक ?

पोलिसांचे म्हणणे आहे की धम्मिका निरोशनाचा यापूर्वी कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात सहभाग नव्हता. तो नुकताच दुबईहून श्रीलंकेला परतला होता. एका स्थानिक वेबसाईटनुसार, पोलिसांनी सांगितले आहे की मृत व्यक्ति दसून मनवाडूच्या ओळखीची होती, जो अंडरवर्ल्ड ग्रुपचा सदस्य आहे आणि तो दुबईला चालून गेला आहे. धम्मिका निरोशना नुकताच UAE मध्ये काम करत होता. गेल्या काही महिन्यात अंबालागोंडा येथे अशा अनेक घटना घडल्या आहेत आणि स्थानिक रहिवाश्यांसाठी आता हा चिंतेचा विषय ठरला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img