4 C
New York

Sharad Pawar : छगन भुजबळांच्या भेटीवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Published:

पुणे

पिंपरी चिंडवडमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यानंतर पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं. लोकसभेला सहकाऱ्यांना (Loksabha Election) जागा देण्याची परिस्थिती नव्हती. संधी भेटली तर डाव्यांना संधी देण्याचा विचार होता असा खुलासा शरद पवारांनी केला आहे. (Sharad Pawar) तसंच, त्यांनी यावेळी विधानपरिषदेच्या निवडणुकीवरही (Legislative Council Elections) भाष्य केलं. 12 मत शेकापला देण्याचा शब्द दिला होता. त्यामध्ये 50 टक्के शेकापला 50 टक्के ठाकरेंना असं ठरलं होतं. (MLC) दरम्यान, एक नंबरची मत काँग्रेसला द्या असंही आपण सांगितलं होत असंही पवार म्हणाले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, मला ताप होता. मात्र, भुजबळांनी भेटायचा आग्रह धरला. महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी आहेत असे ते म्हणाले. जरांगेंशी मुख्यमंत्री शिंदेसोबत काय चर्चा केली हे आम्हाला माहीत नाही. सरकारने जरांगेंना काय आश्वासन दिले, ओबीसी आंदोलकांना काय आश्वासन दिले याचे वास्तव समोर येत नाही तो पर्यंत बैठकीला जायचे नाही, अशी आमची भूमिका होती. शिंदेंनी मनोज जरांगे आणि हाके यांच्याशी चर्चा काय केली हे मला माहीत नाही. सरकारने आरक्षणावर सामंजस्याची भूमिका घ्यावी असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, सरकारने मनोज जरांगे पाटील यांना काय आश्वासन दिलं हे मला माहिती नाही. मात्र, आज राज्यात शांततेची गरज आहे याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. ती शांतता निर्माण व्हायलाचं पाहिजे या मताचा मी आहे. तसंच, जरांगे यांच्यासोबत जर सरकारने संवाद साधला असेल तर त्यामध्ये विरोधकांचं काय काम असा प्रतिप्रश्न उपस्थित करत पवारांनी सत्ताधाऱ्यांनी सर्वपक्षीय बैठकीवरून केलेल्या टीकेवरही उत्तर दिलं आहे. तसंच, अगोदर विरोधकांना बाजूला ठेवलं आणि आता विचारतायेत असा टोलाही पवारांनी लगावला आहे.

शरद पवार म्हणाले, काँग्रेसकडे अधिकचे मतं होती. आमच्याकडे बारा मतं होती. ठाकरे गटाकडे आमच्यापेक्षा जास्त मतं होती. काँग्रेसने पहिली मतं त्यांच्या उमेदवाराला देणं साहजिकच आहे. पण, उरलेली पहिली आणि दुसऱ्या पसंतीक्रमाची मतं योग्यपणे दिली असती तर तिन्ही उमेदवार निवडून आले असते. पण, आमची रणनीती चुकली , असं शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार म्हणाले, जयंत पाटील यांच्याबाबत महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये निर्णय झालेला नव्हता. माझ्याकडे १२ मतं होती. शेकापच्या उमदवाराला पाठिंबा द्यावा असं आम्हाला वाटत होतं. कारण, लोकसभा आम्ही डाव्या पक्षांसोबत लढवली होती. त्यांनी काही जागा मागितल्या होत्या, पण ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यामुळे जयंत पाटील यांना आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, संधी आली तर डाव्यांना प्राधान्य द्यावं असं मला वाटत होतं. काँग्रेसची मतं जास्त होती. ठाकरेंकडे पुरेसी मतं नव्हती. पण, त्यांनी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. रणनीतीमध्ये मतभिन्नता होती. माझं व्यक्तिगत गणित वेगळं होतं. निवडून येण्यासाठी २३ मतं आवश्यक होती. काँग्रेसकडे माझं म्हणणं होतं, तुमच्या उमेदवाराला मतं देऊन उरलेली मतं ५० टक्के ठाकरे गटाला द्या आणि ५० टक्के मतं जयंत पाटलांना द्या, असं पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, गरजेपेक्षा जास्त मतं असल्याने ती टान्सफर होत होती. जास्तीच्या काँग्रेस आमदारांनी पहिलं मतं ठाकरेंना द्यावं आणि सैनेच्या आमदारांनी दुसरं मत शेकापला द्यावं, हे जर गणित जुळून आलं असतं तर तिन्ही उमेदवार निवडून आले असते. हे गणित सगळ्यांना मान्य झालं नाही. त्यामुळे जयंत पाटील जिंकून येऊ शकले नाहीत, असं शरद पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img