22.9 C
New York

Koyna Dam Earthquake : कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का

Published:

सातारा

पाटण तालुक्यातील कोयना धरण (Koyna Dam) आणि पोफळी परिसराला बुधवारी दुपारच्या सुमारास भूकंपाचा सौम्य (Koyna Dam Earthquake) धक्का बसला. 2.8 रिश्टर स्केलचा हा धक्का होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 13.6 किलोमीटर अंतरावर होता. दरम्यान, भूकंपामुळे धरणाला कोणताही धोका पोहचला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

कोयना धरण परिसराला बुधवारी दुपारी 2.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा सौम्य धक्का बसला. 3.26 मिनिटानी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू धरणाजवळच्या हेळवाक गावापासून 13 किलोमीटर अंतरावर होता. कोयनानगरसह चिपळूण तालुक्यातील पोफळी परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

कोयना धरण पूर्णपणे सुरक्षित

कोयना धरण परिसरात झालेल्या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहचलेला नाही. धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण व्यवस्थापनाने दिला आहे. हा भूकंप कोयनानगरसह चिपळूण तालुक्यातील पोफळी, अलोरे या परिसरात देखील जाणवला. भूकंपाचा धक्का सौम्य असल्यानं तो दूरवर जाणवला नाही.

भूकंपाचा केंद्रबिंदू १३ कि. मी अंतरावर

कोयना परिसरात झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू धरणानजीकच्या हेळवाक गावाच्या पश्चिमेला १३ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची जमिनीतील खोली १५ किलोमीटर होती. भूकंपामुळे कोठेही पडझड झाल्याचे वृत्त नाही. तसेच कोयना धरणाला देखील धोका पोहचलेला नाही.

जानेवारीत झाला होता ३.१ रिश्टर स्केलचा भूकंप

कोयना धरण परिसरात लहान-मोठ्या भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच असते. त्यातील सौम्य धक्के हे जाणवत देखील नाहीत. या अगोदर २८ जानेवारी रोजी धरण परिसरात ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याचा केंद्रबिंदू धरणापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img