3 C
New York

Pooja Khedkar : पूजा खेडकरांची निवड रद्द होणार,महाराष्ट्र शासनाचे आदेश

Published:

अनेक गैरव्यवहार समोर आल्यानंतर आता वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे त्यांच्याविरुद्ध कारवाईला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. कारण, जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम पूजा खेडकर यांचा स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत.(Avinash Dharmadhikari) तर, मसुरीतील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीमध्ये त्यांना परत बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना बसलेल्या हा पहिला कारवाईचा धक्का आहे.

Pooja Khedkar दोन जणांची निवड रद्द

या प्रशिक्षण संस्थेने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे, पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं आता स्पष्ट झालय. पुण्याच्या बाणेरमधील बंगल्याला कुलूप लावून दुसरीकडे खेडकर कुटुंबीय पळून गेले आहेत. तर, दुसरीकडे पूजा खेडकर यांची परतवारी सुरू झाल्याचं दिसून येत आहे. आता, याबाबत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनीही भूमिका मांडली आहे. तसंच, यापूर्वी दोन जणांची निवड रद्द झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

ओमानच्या किनाऱ्यावर तेलवाहू जहाज बुडाले; 13 भारतीय बेपत्ता

Pooja Khedkar प्रकरण गंभीर

अपंग आणि दिव्यांग पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्राचं प्रकरण गंभीर आहे, सरकार पुढचे पाऊल या गांभीर्याने उचलत आहे. विशेष म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेत पूजा खेडकर अजून कायम झालेल्या नाहीत, त्यांचं अद्याप प्रशिक्षण सुरू आहे. त्यामुळे, राज्य सरकारने जे पाऊल उचललं आहे, ते योग्य आहे, असं अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे. तसंच, या प्रकरणात कोणताही दबाव येऊ नये, दूध का दूध पानी का पानी व्हायला पाहिजे, अशी मागणीही धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img