4 C
New York

Oman : ओमानच्या किनाऱ्यावर तेलवाहू जहाज बुडाले; 13 भारतीय बेपत्ता

Published:

ओमानच्या किनारपट्टीवर एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. (Oil Tanker) येथे तेलाचं जहाज उलटल्याने 13 भारतीयांसह 16 लोकांचा संपूर्ण क्रू बेपत्ता झाला आहे. भारतीयांसह इतर लोकांचा अद्याप शोध लागलेला नाही. दरम्यान, इतर तीन क्रू मेंबर्स श्रीलंकेचे होते. (Tanker) या जहाजाचे नाव प्रेस्टिज फाल्कन असं आहे.ओमानमधून (Oman) येमेनच्या दिशेनं जाणारं तेलवाहू जहाज बुडाल्याची माहिती मिळत आहे. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्रानं यासंदर्भात माहिती दिली आहे. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राच्या म्हणण्यानुसार, या तेलाच्या टँकरचं नाव प्रेस्टीज फाल्कन असल्याचं सांगितलं जात आहे.

Oman 2007 मध्ये बांधलं

LSEG च्या शिपिंग डेटानुसार, तेल टँकर एडनच्या येमेनी बंदराच्या दिशेने जात होता आणि देशाच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या ओमानच्या डुकम या औद्योगिक बंदराजवळ उलटला. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, तेल टँकर हे 117 मीटर लांब जहाज आहे, जे 2007 मध्ये बांधलं गेलं होतं.

‘या’ ठिकाणी पुढील 12 तास मुसळधार पावसाचा इशारा

ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, 13 भारतीयांसह 16 क्रू मेंबर्सना घेऊन जाणारं एक तेलवाहू जहाज ओमानच्या किनाऱ्याजवळ बुडालं आहे. क्रू मेंबर्स बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच बचावकार्यही सुरू करण्यात आलं आहे. सिक्योरिटी सेंटरनं सोशल मीडियावरुन दिलेल्या माहितीनुसार, कोमोरोसचा झेंडा असलेलं तेलवाहू जहाज ‘Prestige Falcon’ च्या क्रूमध्ये 13 भारतीय आणि तीन श्रीलंकेचे नागरिक आहेत. ओमानी बंदर डुक्मजवळ रास मदारकाच्या आग्नेय-पूर्वेस 25 नॉटिकल मैलांवर सोमवारी जहाज कोसळले.

Oman माहिती मिळताच अधिकाऱ्यांकडून बचावकार्य सुरू

सागरी सुरक्षा केंद्रानं ट्वीट करून माहिती दिली आहे की, हा कोमोरोस ध्वजांकित तेल टँकर रास मद्राकाच्या दक्षिण पूर्वेस 25NM बुडाला आहे. त्याच्या शोध आणि बचावासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनांनुसार, तपासाचं काम सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, ओमानच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावर स्थित दुक्म बंदर, देशातील प्रमुख तेल आणि वायू खाण प्रकल्पांसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img