आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, माझा शेतकरी सुखी-समाधानी राहो दे, राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, असं साकडं आपण विठ्ठल चरणी घातलं. (Pandharpur) दरम्यान, यावेळी मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे व त्यांच्या पत्नी आशा बाळू अहिरे या वारकरी दांपत्याला मान मिळाला. (Ashadhi Ekadashi) आज आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.
Ashadhi Ekadashi बळीराजा सुखी होऊ दे, राज्यातील जनता आनंदी होऊ दे
मी विठ्ठलाकडे नेहमी जनतेसाठी बळीराजासाठी मागणं मागत असतो. बळीराजा सुखी होऊ दे. चांगला पाऊस होऊ दे, चांगल पिक येऊ दे. त्याच्या जीवनात समृद्धी होई दे हे मागण बळीराजाकडे मागितल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या राज्यातील जनता सुखी होऊ दे. राज्यातील प्रत्येक घटक यांच्या जीवनात आनंदाचे दिवस विठ्ठलाने आणावे असं मागणं देखील मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आज सळीकडे भक्तीमय वातावरण झालं आहे. यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशिर्वादाने राज्याचा कारभार सुरु आहे. या राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याचं पिक चांगलं येऊ दे, चांगला पाऊस येऊ दे शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असं मागणं विठ्ठलाला मागितल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा नाना पटोले यांचे विठ्ठलाला साकडे
Ashadhi Ekadashi अहिरे दाम्पत्य
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत शासकीय महापूजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे ( वय 55 ) आणि सौ आशाबाई बाळू अहिरे ( वय 50 ) या दाम्पत्याला मिळाला. गेली सोळा वर्षे हे दाम्पत्य पंढरीची वारी करत आहेत. अहिरे दांपत्य हे सटाणा तालुक्यातील अंबासन इथले वारकरी आहेत. त्यांचा शेती हा व्यवसाय आहे. शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकऱ्यांना महामंडळाच्या वतीनं वर्षभरासाठीचा मोफत पास यावेळी देण्यात आला.
Ashadhi Ekadashi माझ्या आयुष्यातील भाग्याचा दिवस
हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा दिवस आहे. कारण सलग तिसऱ्या वर्षी मला श्री विठ्ठल रुक्मिणीची महापुजा करण्याचं भाग्य लाभल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आपण सर्वजन वारकऱ्यांची भगवी पताका फडकत ठेवत आहात, त्याबद्दल आपले सर्वाचं आभार असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.