23.1 C
New York

Maratha Reservation : ‘तुम्हाला हे राज्य रक्तबंभाळ करायचं का?’ जरांगे पाटलांचा फडणवीसांना सवाल

Published:

जालना

जालना येथे मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे प्रमुख नेता मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जालन्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीसांना इशारा दिला की मराठ्यांना डिवचू नका त्याचबरोबर, त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) भूमिकेवरही भाष्य केले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला गोडगोड बोलायचं हा देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा डाव दिसतो. ओबीसी नेते मराठा समाजाच्या अंगावर घालायचे, देवेंद्र फडणवीस सारख्या एवढ्या मोठ्या नेत्याने इतके छिचोरे चाळे का करायला पहिजे? महाविकास आघाडीची आणि महायुतीची बैठक लावली होती, तेव्हापासून सगळे विरोधात बोलायला लागले. फडणवीस साहेब, तुम्ही नेमका तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती की प्रत्येकाला मराठ्यांविषयी द्वेष ओकायला लावताय? कारण प्रकाश आंबेडकर साहेब प्रत्येक वेळी मार्ग सांगायचे, तुम्हाला सलाईनमधून औषध घालतील, असं ते सांगायचं. पण तेच आज विरोधात बोलत आहेत. इतकं शोकिंग वाटतंय. आंबेडकर साहेब पण म्हणाले, सगे सोयऱ्याची अंमलबजावणी करू नका, त्यांचा पक्ष म्हणतो की नोंदी रद्द करा. मराठ्यांची एससी, एसटीच्या आरक्षणाची मागणीच नाही”, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला हे राज्य रक्तबंभाळ करायचं आहे का? नेमकं तुमचं काय चाललंय हेच कळत नाही. आमच्या सगेसोयऱ्यांना मराठ्यांना त्रास द्यायचा. म्हणजे तुम्ही आमच्या सोयऱ्यांना त्रास देणार. फडणवीस साहेब, तुमचे पण राज्यात सोयरे आहेत. आम्ही त्यांना त्रास देत नाहीत. एवढा मोठा उच्चदर्जाचा भाजपचा नेता मराठ्यांविषयी डाव करतो? मला तर फडणवीस साहेबांचं आश्चर्य वाटायला लागलंय. वारंवार एकच शब्द काढायचा की, शरद पवारांनी काही दिलं नाही. त्यांच्याकडे मोर्चा वळवला. पण ते आता कुठे सत्तेत आहेत? साष्ट पिंपळगावच्या आंदोलनावेळी त्यांच्याकडेच आमचा मोर्चा होता. दोन टप्प्यात दोन भूमिकेत वागणाऱ्या अवलादी आमच्यात नाहीत. सत्तेत तुम्ही आहात. त्यांनी काय नुकसान केलं आम्हाला माहीत आहे, म्हणून तुम्हाला करायचंय का आता?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आपण गरिबांसाठी लढू, त्यांच्या फाश्यात फासून गोरगरीब जनतेला काहीच मिळणार नाही. माझी खरंच विनंती आहे, गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब दलितांना आपण एकत्र आणलं पाहिजे, आपण आपल्यालाच न्याय देऊ शकतो”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना केलं. यावेळी मनोज जरांगे यांना प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत एकत्र यायला पाहिजे का? या प्रश्नाचं उत्तर दिलं. “ते सोबत येणार आहेत की नाही मला माहीत नाही. आम्ही त्यांना विरोधक मानलं नाही. आताची वक्त्यवे बघितली तर गरिबांना कसा न्याय मिळणार? न्याय देण्यासाठी एकत्र यावं लागेल. ते बोलायला तयार नाहीl. अंबलबजावणी रद्द करा म्हणतात.हे आम्हाला अपेक्षित नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img