Kim Kardashian: अभिनेत्री किम कार्दशियन (Kim Kardashian) ही हॉलीवूडची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकतीच किम कार्दशियन ही भारतात आली होती. नुकतंच पार पडलेल्या उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका यांच्या लग्नसोहळ्यात किम कार्दशियने खास उपस्थिती दर्शवली होती. या लग्नसोहळ्यामधील काही खास फोटो किमने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यातला एक फोटो गणपतीच्या मिर्तीसोबत आहे. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा प्रचंड सामना करावा लागलाय. त्यानंतर तिने हा फोटो तातडीने हटवला आहे.
काय घडलं नेमकं ?
Kim Kardashian: राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नामध्ये किमने एक खास स्टायलिश ड्रेस परिधान केला होता. ज्यात तिने विविध पोज देऊन फोटो काढले. ज्यातला एक फोटो गणपती बापाच्या मूर्तीसोबत होता. यावरून नेटकऱ्यांनी तिला खडे बोल सुनावण्यास सुरुवात केली. तसंच मुकेश अंबानी यांनाही टॅग करून तुमच्याकडे आलेल्या पाहुनीला जरा चांगली पद्धत शिकवा असं सांगू लागले. एका फोटोमध्ये किमने गणपतीच्या मूर्तीचा आधार घेऊन एक विचित्र फोटो काढला होता. लोकांनी लगेचच ऐकवण्यास सुरुवात केली, ती गणपतीची मूर्ती आहे तुमच्यासाठी दिलेला एखादा खांब किंवा फोटो काढण्यासाठीचा आधारस्तंभ नाही. अशाप्रकारे ट्रोलिंग केल्यानंतर किमने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो तातडीने डिलीट करून टाकला.
अगदी कौतुकास्पद! संस्कृती बालगुडे कॅन्सर पेशंटला करणार केस दान;
ट्रोलिंग होताच फोटो केला डिलीट
Kim Kardashian: मुंबईमधील अंबानींच्या लग्नसोहळ्यात किम कार्दशियनने ऑफव्हाईट लेहेंगा परिधान केला होता, जो प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केला होता. या ऑफव्हाईट लेहंग्यात किमने अतिशय सुंदर फोटोशुट केलं. हे सगळे फोटोशूट तिने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करून त्याला कॅप्शनमध्ये लिहिलं की, ” खास हिरे आणि मोती अंबानींच्या लग्नासाठी” असं लिहिलं. किमने फोटो पोस्ट करताच फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले. नेटिझन्सना किम कार्दशियनचा हा भारतीय लूक प्रचंड आवडला, मात्र तिच्या एका फोटोकडे अनेक जणांचं लक्ष गेलंच. या फोटोमध्ये किम कार्दशियन गणपतीच्या मूर्तीचा फोटो प्रॉप’ (बाप्पाच्या मूर्तीचा आधार घेतलेला) चुकीचा वापर करताना दिसत होती. या फोटोमध्ये किमने तिचे दोन्ही हात गणपतीच्या मूर्तीवर ठेऊन वाकून उभी राहून पोज देताना दिसली. किमचा हा फोटो तुफान व्हायरल होऊन तिला ट्रोल करण्यात आलंय. यानंतर तिने कोणत्याच प्रकारचं स्पष्टीकरण न देता शांत पणे फोटो तिच्या पोस्टवरून उडवून टाकला. वृत्तानुसार, हा फोटो हेमिश पटेल यांनी पोस्ट केला आहे.
लोकांनी केल्या ह्या कमेंट्स
किम कार्दशियनची अशी पोज गणपतीच्या मूर्तीसह आक्षेपार्ह असल्याची प्रतिक्रिया नेटकरी देऊ लागले. किमच्या या पोस्टवर कमेंट्स करत भारतीय नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केलं आहे. एका नेटकरी ने म्हंटल, ही काय अमेरिकेतून आली आहे आणि गणपतीच्या मुर्तीसह अशी विचित्र पोज देऊन उभी आहे, तिला काय महत्व वाटत नसेल पण आम्हाला खूप वाटतं. दुसऱ्या नेटकरीने म्हंटल, अंबानी त्यांच्या आलेल्या पाहुण्यांना काही पद्धत शिकवणार नाहीत का? तर एकाने लिहिलं किमने हा फोटो काढायच्या आधी कोणाचा तरी सल्ला नक्कीच घ्यायला हवा होता. अशा विविध कमेंट्स तिच्या फोटो वर येऊ लागल्या, ज्यांनंतर किमने स्वतः हा फोटो डिलीट करून टाकला.