Lip Care in Monsoon: पावसाळा आता जल्लोषात सुरु झाला आहे. या ऋतूमध्ये आपली त्वचा, केस, यांच्यासोबत ओठांचीही काळजी घेणं फार आवश्यक असते. जर तुम्ही सुद्धा फाटलेल्या ओठांनी त्रस्त झाला असाल, तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. आपटे ओठ सुंदर व मऊ राहावेत यासाठी प्रत्येक जण,विशेषतः महिला जास्त प्रयत्न करत असतात. अशातच आम्ही तुम्हाला तुमचे ओठ सुंदर, मऊ आणि गुलाबी ओठ मिळवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत.
Lip Care in Monsoon: हा उपाय अवलंबण्यासाठी सर्वात पहिलं अॅलोवेरा जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि बदाम तेल घ्या. मग या तिन्ही गोष्टी एकत्रित करून मिसळा. यानंतर झालेलं द्रावण एका छोट्या काचेच्या बाटलीत किंवा खाली कंटेनरमध्ये भरून ठेवा. आता हे द्रावण तुम्ही नियमितपणे ओठांना लावल्यास तुम्हाला चांगला फायदा होईल.
‘जागतिक सर्प दिवस’ नेमका आहे तरी काय? जाणून घ्या इतिहास
खोबरेल तेलाचा वापर
Lip Care in Monsoon: सर्वात पाहिलं म्हणजे तुम्हाला तुमचे ओठ कोमट पाण्याने वॉश करावे लागतील. मग तुमचे ओठ कोरडे करून हलक्या हातांनी तेल लावून थोडा मसाज करा. रात्री झोपतानाच हे लावल्यानंतर पूर्ण रात्रभर तेल ओठांवर राहू द्या. त्यांनतर दुसऱ्या दिवशी परत एखादा सकाळी ओठ कोमट पाण्याने वॉश करा. मग दोन दिवसांत तुम्हाला या उपायाचा परिणाम नक्कीच दिसून येईल.
मध लीप स्क्रब आणि नारळ
या उपायामध्ये तुम्हाला अर्धा चमचा कोमट पाणी घ्या त्यात एक चमचा खोबरेल तेल,यानंतर एक चमचा मध व २ चमचे ब्राऊन शुगर हे घटक त्यात मिसळावे लागतील. या सर्व गोष्टी मिसळून त्याची घट्ट पेस्ट बनवा. आणि ही पेस्ट पाच मिनिटं ओठांवर राहू द्या नंतर ते कोमट पाण्याने धुवा.
दुधाची साय
तुम्हाला सुद्धा कोरड्या ओठांचा त्रास होत असेल तर, दुधाची साय तुमची यातून नक्कीच सुटका करू शकेल. कोरड्या ओठांवर दुधाची साय लावल्याने ओठांना फायदा होईल.
कोरफडचा वापर
कोरफडचा वापर त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतो. फाटलेले ओठ हे मऊ करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. रात्री झोपण्याआधी तुम्ही तुमच्या ओठांवर कोरफडचं जेल लावू शकता. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ते धुवून टाका. काही दिवसातच तुम्हाला या समस्येतून आराम मिळू शकेल.
बीट आणि गाजराचा रस
तुम्हाला तुमच्या ओठांवरचा काळपटपणा घालवायचा असेल तर, एक छोटा चमचा गाजर आणि बीटाचा रस आणि छोटा चमचा ई जीवनसत्त्वाची कॅप्सूल घ्यावी. एका छोट्याश्या वाटीत गाजर आणि बीटाचा रस काढून घ्यावा. त्याच्यामध्ये ई जीवनसत्त्वाची कॅप्सूल फोडून टाकावी.नंतर हे मिश्रण एकजीव करून घ्या, आणि हे मिश्रण तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ओठांना लावावे. हा उपाय नियमित केल्याने ओठ मऊ आणि मुलायम तर होतातच, मात्र याशिवाय ओठ गुलाबीही होतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली बातमी ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून, अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)