4.2 C
New York

Weather Update : ‘या’ ठिकाणी पुढील 12 तास मुसळधार पावसाचा इशारा

Published:

मुंबईसह महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केलाय. १६ ते १९ जुलै दरम्यान राज्यभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभाग देखील रोज पावसाबद्दलच्या अंदाज सांगत आहेत. अशातच आता 17 जुलै 2024 रोजी हवामान विभागाने आज म्हणजे पावसाचा (Weather Update) अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी त्याचप्रमाणे मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे या विभागाला ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये देखील मागील काही दिवसांपासून पावसाचा तडाका लागलेला होता. या ठिकाणी देखील आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये कमाल तापमान हे 29 अंश सेल्सियस ते किमान तापमान 25° c एवढे असणार आहे.

Weather Update चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई आणि ठाण्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस गेल्या २४ तासांत झाला (Maharashtra Weather Forecast Update) आहे. राज्यात सरासरीच्या १५ टक्क्यापेक्षा जास्त पाऊस १५ जुलैपर्यंत पडला. कोकण विभागात ३० टक्के आणि मध्य महाराष्ट्रात २२ टक्के पाऊस झालाय. दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असला तरी मराठवाड्यात या मोसमात अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

राज्य सरकारची लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Weather Update अलर्ट जारी…

हवामान खात्याने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, परभणी, अमरावती, वर्धा आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी (Heavy Rain Alert) केलाय. गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. पूरसदृश परिस्थिती अनेक शहरांमध्ये निर्माण झाली आहे, त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. याउलट, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये तब्बल आठवडाभरानंतर रविवारी सायंकाळी हलक्या सरी (Weather Update) बरसल्या.

Weather Update पुढील चार दिवस महत्वाचे

हवामान खात्याने मंगळवारी केरळ, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी (Rain Update) केलाय. १७ आणि १८ जुलैला उत्तराखंड, १८ जुलैला राजस्थान, १९ जुलैला ओडिशा आणि १८ आणि १९ जुलैला आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. याशिवाय, उत्तर प्रदेश आणि इतर १९ राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस महत्वाचे आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img