19.7 C
New York

Bigg Boss Ott 3: बिग बॉसच्या घरात झाला राडा! पार मारामारी पर्यंत गेलं…

Published:

Bigg Boss Ott 3: ‘बिग बॉस ओटीटी’च्या (Bigg Boss Ott 3) घरात रोज एक नवीन काहीतरी पाहायला मिळतंय. कधी मोठा राडा तर कधी मारामारी. बिग बॉस ओटीटी तिसरा पर्व चांगलाच गाजत असताना दुसरीकडे घरात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर थेट साई केतन राव या स्पर्धकाला त्याच्या आईवरून शिवीगाळ करण्यात आली आहे. यावर घरात सर्वांचा मोठा हंगामा झाला आहे. कवकेश कटारिया याने साई केतन रावला शिवीगाळ केली, ज्यावरून घरातलं वातावरण हे चांगलच तापलं असल्याचं पाहायला मिळालं. साई केतन राव हा घरातल्या एका मुद्यावर स्वतःच एक मतं मांडत होता. विशेष म्हणजे साई केतन राव याच बोलणं हे कटारियाला ऐकायचंच नव्हतं. त्यानंतर कटारिया आपलं बोलणं ऐकत नसल्यामुळे साई केतन राव भडकतो.

Bigg Boss Ott 3: साई केतन राव हा एक आक्षेपार्य शब्द बोलतो. त्यानंतर कटारिया थेट साई केतन रावला आईवरून शिवीगाळ करतो. त्यानंतर साई केतन राव अफलातून चिडतो आणि कटारिया याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून जातो. मात्र, यावेळी सर्व घरातील सदस्य त्याला पकडण्यासाठी जातात. अरमान मलिक आणि त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिक साई केतन रावला पकडून ठेवतात. मात्र, साई केतन राव इतका संतापतो की, तो थेट घरातली खुर्ची उचलून फेकून देतो. सर्वात विशेष गोष्ट ही आहे की, काही दिवसांपूर्वीच साई केतन राव घरातल्या सदस्यांना सांगत असतो की, त्याच्यासाठी त्याची आई खूप जास्त महत्वाची आहे.

Bigg Boss Ott 3: साई केतन रावच्या वडिलांनंतर त्याच्या आईने खूप जास्त कष्ट घेतले आणि त्यांना शिकवलं हे साई केतन रावने आधीच काही दिवसांपूर्वी सांगितलं होत. यातच लवकेश कटारियाने आज त्याला त्याच्या आईवरून शिवीगाळ केल्याने त्याला राग अनावर झाल्याच पाहायला मिळतंय. आता विकेंडच्या वारमध्ये या वादावरून अनिल कपूर घरातल्या सदस्यांना चांगलच खडेबोल सुनावताना दिसणार आहेत.

गणपतीच्या मुर्तीसोबत विचित्र पोज दिल्याने किम कार्दशियन ट्रोल, नेटकरी भडकले

याआधी घरामध्ये अरमान मलिक याच्या दुसऱ्या पत्नीबद्धल चुकीची कमेंट केल्यामुळे अरमानने काही दिवसांपूर्वीच विशाल पांडे यांच्या कानाखाली पेटवली होती. यानंतर घरातल्या सदस्यांनी मोठा निर्णय घेत अरमानला कायमच नॉमिनेशनसाठी टाकलेलं. आता हे बिग बॉस ओटीटी तिसऱ्या पर्वामधलं सर्वात मोठं भांडण आहे. घरात बिग बॉसच्या प्रॉपर्टीचे नुकसान केल्याने आता साई केतन राव याला कोणती शिक्षा मिळणार हे पाहण्यासारखं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img