23.1 C
New York

Ashadhi Ekadashi : भोपर गाव बनले प्रतिपंढरपूर विद्यार्थी बनले वारकरी

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त भोपरगावात जे.के.पाटील विद्यालयाच्या (J K Patil College) वतीने गेली आठ वर्ष आषाढी एकादशी निमित्त आषाढी दिंडी काढली जाते. यावर्षी संस्थापक अध्यक्ष गजानन पाटील (Gajanan Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतून पालखी नेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी भोपर गावात दिंडी काढली.

विठल – रखुमाईच्या वेशभूषेतील शाळकरी विद्यार्थी, टाळ – मृदूंग वाजवत वारकरी विद्यार्थी, तुळशीचे रोप डोक्यावर घेत विद्यार्थ्यांनी आणि विठ्ठलाचा जयघोष करत निघालेल्या दिंडीने भोपर गाव प्रति पंढरपूरचे रूप आले होते. गावकऱ्यांनी हे दृश्य आपल्या मोबाईल मध्ये टिपले. पुढे ही दिंडी गावातील मंदिरात आल्यावर पालखी, विठ्ठल रखुमाई यांच्या भोवती वारकरी बनलेल्या विद्यार्थ्यांनी रिंगण करत विठू माऊलीचा गजर केला. या दिंडीत गावकरी सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img