23.1 C
New York

Raj Thackeray : राज ठाकरेंनी विठुरायाला घातलं ‘हे’ साकडं

Published:

मुंबई

आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठ्ठलाची मनोभावे पूजा केली जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह मानाच्या वारकऱ्याच्या हस्ते पहाटे पंढरपूरात विठ्ठलाची महापूजा पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या शुभेच्छा देताना महाराष्ट्रातील सद्याची परिस्थिती पाहून राज ठाकरे यांनी विठुरायाच्या चरणी साकडं देखील घातले आहे. राज्यात सुरु असलेल्या जातीपातीच्या राजकारणावरुन एक पोस्ट लिहीत राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज ठाकरे यांनी आषाढी एकादशीनिमित्त ट्वीट केले आहे. गेली आठ शतके विठ्ठलाच्या ओढीने पंढपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे, आपल्या परंपरेत वारीसारखे काही नाही, असे नाही. ‘यात्रा’ ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या. त्या देखील एकदाच घडतात, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

वारीचे असे नाही. विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात. निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे, ही श्रद्धा मनात घेऊन निघायचे. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचे आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे, असे मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img