World Snake Day 2024: जगातले असे बरेच दिवस असतात जे साजरे केले जातात, मात्र काही दिवस अनोखे देखील दिसतात. अशातलाच एक दिवस म्हणजे ‘जागतिक सर्प दिन’ (World Snake Day) हा सर्प दिवस जगभरातल्या सापांविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि लोकांमधले गैरसमज दूर करण्यासाठी जगभरात साजरा केला जातो. अनेक जणं सापांना घाबरतात. सापच हा एक अशा प्रकारचा प्राणी आहे ज्याच्याविषयी जगामध्ये बहुधा जास्त गैरसमज आहेत. तरीही साप हा महत्वाचा प्राणी आहे. आपण जिथे राहतो तिथल्या इकोसिस्टमसाठी साप हा प्राणी महत्वाचा आहे. स्वतःच संरक्षण करण्याचं तंत्र खुद्द सापाकडे आहे. सापांचे दात ते त्यांच्या विषारी विषासाठी वापरतात. लोकांना सरीसृपांबद्दल आणि ते जगाला कोणत्याप्रकारे योगदान देतात याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यास मदत करण्यासाठी ‘जागतिक सर्प दिवस’ तयार करण्यात आला आहे. ‘जागतिक सर्प दिवस’ साजरा करण्यासाठी सापाच्या रूपाविषयी आणि ते कसे जगतात याबद्धल जागरूकता करण्यासाठी हा दिन साजरा केला होता.
सावधान! मेकअप करताना ‘या’ चुका तुम्हीही करता? चेहऱ्याचा नक्षा बिघडू शकतो
जागतिक सर्प दिवसाचा इतिहास
World Snake Day 2024: आतापर्यंत सर्वात प्राचीन जीवांपैकी अस्तित्वात असणारा एक जीव म्हणजे साप आहे. जगातल्या विविध संस्कृतींमध्ये साप अस्तित्वात आहे. सापांच्या 3,000 हून अधिक प्रजाती जगभरात आढळतात. जगातल्या बहुतेक समुद्रांमध्ये साप आढळतात. साप हे निसर्गाचा समतोल राखण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका बजावतात. सापांमध्येसुद्धा विविधता असते, त्याच्यात काही जाती दिसायला फार मोहक असतात.
जागतिक सर्प दिनाचे महत्त्व
World Snake Day 2024: जंगलतोड, हवामानातील बदलामुळे सापांच्या अधिवासात घट होण्यासारखी परिस्थिती झाली आहे. त्याचं हित जपण्यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. अंटार्टिका वगळून सर्व खंडामध्ये साप हे समुद्र, वाळवंट, जंगले, इथे आढळतात. लहान उंदीर, कीटक, आणि बेडूक यासह साप हा विविध प्राण्यांचा वापर अन्न म्हणून करतो. साप हा त्यांचा शिकार पूर्ण खातात. फार मोठे साप अगदी डुकर, माकड, लहान हरीण खाऊन शकतात.