21 C
New York

Champions Trophy : डेव्हिड वॉर्नर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार ? सेलेक्टरने सांगितले सत्य

Published:

निर्भयसिंह राणे,

आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2024 (ICC T20 World Cup) स्पर्धा झाल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. ज्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरचा (David Warner) देखील समावेश होता. निवृत्तीची घोषणा करताना त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचे संकेत दिले होते. मात्र ऑस्ट्रेलिया (Australia) संघाचा मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेलीने वॉर्नरच्या खेळण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. बेलीने दिलेल्या माहितीनुसार, डेव्हिड वॉर्नर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy) स्पर्धेत खेळताना दिसून येणार नाही. डेव्हिड वॉर्नरने गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर 50 ओव्हर्स फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली.

ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी पृष्टि केली की डेव्हिड वॉर्नर पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विचारात नाही. गेल्या वर्षभरात वॉर्नरची आंतरराष्ट्रीय निवृत्ती काही भागांमध्ये आली आहे. डिसेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामान्यांच्या लाल बॉल फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा दिली होती.

गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याने 50 ओव्हर्सच्या फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली. गेल्या महिन्यात, ऑस्ट्रेलिया सुपर 8 टप्यात T20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये त्याने निवृत्ती घेतली.

Hardik Pandya: वडोदरामध्ये हार्दिक पांड्याचे भव्य स्वागत

गेल्या आठवड्यात, एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये, वॉर्नरने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी स्वतःला उपलब्ध करून दारं उघडली. मी काही काळ फ्रॅंचाईसी क्रिएकट खेळात राहीन, आणि निवड झाल्यास मी चॅम्पियन्स ट्रॉफटीमध्ये खेळण्यास तयार आहे त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले.

ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय निवडकर्ता जॉर्ज बेलीने पृष्टि केली की वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थानच्या योजनांमध्ये नसेल कारण ते स्पर्धेची तयारी करत आहेत. “आमची समजूत अशी आहे की डेव्हिड निवृत्त झाला आहे, आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याची जी अविश्वसनीय कारकीर्द आहे त्याचे कौतुक केले पाहिजे. निश्चितपणे आमची अशी योजना आहे की तो पाकिस्तानमध्ये येणार नाही,” असं बेलीने सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img