3 C
New York

IAS Pooja Khedkar : पुजा खेडकर प्रकरणात आयकर विभागाची एन्ट्री

Published:

मुंबई

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि (IAS Pooja Khedkar) त्यांच्या कुंटुबियांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाही. आता या प्रकरणात आयकर (Income Tax) विभागाची एन्ट्री झाली आहे. खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी मिळवलेल्या नॉन क्रिमिलेयर (Non Creamy Layer) दाखल्याची चौकशी करून तसा अहवाल मागवण्यात आला आहे. यासाठी आयकर विभागाने खेडकर कुटुंबियांच्या उत्पन्नाची आणि त्यांच्या आई वडिलांनी भरलेल्या टॅक्सची माहिती मागवण्यात आली आहे. नगर जिल्हा प्रशासनानेही ही माहिती गोळा करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.

पूजा खेडकर प्रकरणात केंद्र सरकारच्या कार्मिक विभागानेही चौकशी सुरू केली आहे. या चौकशीसाठी आवश्यक असलेली माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे स्थानिक जिल्हा प्रशासनाकडूनही या प्रकरणात चौकशी सुरू करण्यात आली आहे. पूजा खेडकरांच्या आई वडिलांच्या उत्पन्नाचीही चौकशी केली जात आहे. पूजा खेडकर यांच्या नावावर कोट्यावधींची संपत्ती आहे. या संपत्तीतून त्यांना उत्पन्नही मिळते. आयकर विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या आयटीआरमधून या माहितीचा खुलासा झाला आहे.

पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण आठवडाभर थांबले आहे. पूजा 15 ते 19 जुलै या कालावधीत अकोल्यातील आदिवासी विकास प्रकल्पात इंटर्न म्हणून रुजू होणार होती, मात्र वाशिमच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी याला स्थगिती दिली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत निवड होण्यासाठी पूजावर अपंगत्व आणि OBC आरक्षण कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. पूजाच्या अपंग आणि ओबीसी प्रमाणपत्राची पोलिस चौकशी होणार आहे. प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरचीही चौकशी केली जाईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img