8.7 C
New York

Sunetra Pawar : राजकारणातील मोठी बातमी, सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला

Published:

पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीच्या चर्चा सुरु असतानाच राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज पुण्यात मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. शरद पवार (Sharad Pawar) काल मुंबईहून पुण्याला रवाना झाले होते. आज सकाळी सुनेत्रा पवार मोदी बागेत दाखल झाल्या होत्या. मोदी बागेत दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी नेमकी कुणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यातील या भेटीमुळे राज्यातील राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला होता. त्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. अशात आज पुण्यातील मोदीबाग येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवार यांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार तब्बल एक तास होत्या. त्यानंतर त्या तेथून रवाना झाल्या.

शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीची सर्वत्र चर्चा होत असली तरी, पवार यांची बहीण रुग्णालयात आहेत. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रितपणे त्यांना भेटायला गेले आहेत. यावेळी अजित पवार यांच्या बहिणीबरोबर सुनेत्रा पवार देखील आहेत. त्यामुळे या भेटीला कोणताही राजकीय अर्थ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सर्व पार्श्वभूमिवर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत झाली होती. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर सुमारे लाखभर मतांनी विजय मिळवला होता. दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रावादीने या निवडणुकीत दमदार कामगिरी करत 8 जागांवर विजय मिळवला होता. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदरात अवघी एक जागा पडली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img