3.5 C
New York

Sanskruti Balgude Donate Hairs: अगदी कौतुकास्पद! संस्कृती बालगुडे कॅन्सर पेशंटला करणार केस दान;

Published:

Sanskruti Balgude Donate Hairs: बॉलीवूडच्या अभिनेत्रीं जितक्या चर्चेत असतात तितक्याच मराठमोळ्या अभिनेत्री देखील असतात. नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावरून त्या चर्चेचा भाग बनतात. सध्याच्या सोशल मीडिया माध्यमातून कलाकार मंडळींच्या वैयिक्तक आयुष्यात काय चालू असतं हे पटकन समजतं. याशिवाय कलाकारसुद्धा त्यांच्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्स चाहत्यांना वेळोवेळी देत असतात.

Sanskruti Balgude Donate Hairs: मराठी इंडस्ट्रीमधली सर्वात लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांआधी संस्कृतीने स्वतःचे लांबसडक काळे केस कापून डायरेक्ट बॉय कट केला होता. संस्कृतीचा हा नवीन कोरा लूक समोर आल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. याबद्धल संस्कृतीने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. हा नवीन केलेला हेअरकट संस्कृतीने तिच्या नवीन भूमिकेसाठी केलेला आहे.

Sanskruti Balgude Donate Hairs: याबद्धल संस्कृती म्हणाली की, नवीन भूमिकेसाठी नवीन हेअर कट करणं तो ही अगदी बॉयकट करणं, माझ्यासाठी खरं तर मनामध्ये खूप जास्त धाकधूक होती. परंतु कुठेतरी आपल्याला हे झेपणार आहे का असा प्रश्नही डोकावत होता. कारण मी असा हेअर कट पहिल्यांदाच करणार होती. केस कापून झाल्यांनतर वाटू लागलं की अरे, हे तर खूपच कमाल वाटत आहे. त्यानंतर मी माझ्या टीम सोबत चर्चा करून एक फोटोशूट करूया असं ठरवलं जेणेकरून या हेअर कटच्या खास आठवणी राहतील. तेजस नेरुरकरने माझं हे खास फोटोशूट केलं आहे .

‘मी पुन्हा वडा पाव विकेन’, चंद्रिका शोमधून बाहेर पडताच म्हणाली, माझं अस्तित्व…

“खरं तर मी हा बॉयकट लूक एका चित्रपटासाठी केला आहे. येणारा हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास असून मी या नवीन चित्रपटासाठी खूप जास्त उत्सुक आहे. यामधून काहीतरी वेगळेपण तुम्ही एक प्रेक्षक म्हणून सुद्धा अनुभवाल, यामध्ये तर शंका नाही.”

“नवीन भूमिकेसाठी हा नवीन लूक तर आहे, पण चित्रपटाची स्टोरी उत्तम लिहिली गेली. खरं सांगायचं झालं तर, माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं की कॅन्सर पेशंटला केस दान केले पाहिजे. केस कापण्याच्या दोन दिवस आधी मी इंस्टाग्रामवर स्क्रोल करता करता पाहिलं की, काही मुली त्यांचे केस दान करत होत्या. यातून माझ्या डोक्यात हा विचार आला आणि मग मी हा निर्णय घेतला की मी पण माझे केस कॅन्सर पेशंटला दान केले पाहिजेत. अगदीच थोडे का असतील पण ते दान करून यातून काहीतरी त्यांना मदत होऊ शकते म्हणून मी माझे केस दान केले आहेत.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img