मुंबई
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे आज मोठी घोषणा करणार आहेत. यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे ट्विट करत त्यांनी सांगितले आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर नेमकी काय घोषणा करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा असेल का? राजकारणात मोठी उलथापालथ होणार का? अशी चर्चा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सुरू झाली आहे. त्यामुळे सायंकाळी ॲड. आंबेडकर काय घोषणा करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विधान परिषद निवडणुकीनंतर आता राज्यातील पक्षांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. कुठे कोणता उमेदवार द्यायचा यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मी आज मोठी घोषणा करणार असल्याचे ट्विट केले आहे.