19.7 C
New York

Vishalgad : विशाळगडवर जाण्यापासून शाहू महाराज, सतेज पाटलांना पोलिसांनी रोखले

Published:

कोल्हापूर

विशाळगडावरील (Vishalgad)अतिक्रमण हटवण्यावरुन (Encroachment) सुरू झालेला वाद चांगलाच तापल्याचे दिसत आहे. काल झालेल्या तोडफोडीनंतर आज कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati), काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) हे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले आहेत. मात्र पोलिसांनी (Police) शाहू महाराज छत्रपती, बंटी पाटील यांच्यासह सर्व नेत्यांना विशाळगडावर जाण्यास रोखल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. यानंतर परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेच्या वेळी अज्ञातांनी गोंधळ घालत विशाळगडाच्या पायथ्याला असणाऱ्या गजापूर गावात धुडघुस घातला होता. जमावाने अनेक घरांची मोडतोड करत घर पेटवून देण्याचा प्रयत्नही केला आहे. या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीचे महत्त्वाचे कोल्हापूर जिल्ह्यातले नेते विशाळगडाच्या पायथ्याला जात आहेत.

विशाळगड अतिक्रमणमुक्तीच्या माजी खासदार संभाजीराजे यांच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. गजापूर ते विशाळगड या सुमारे पाच किलोमीटर परिसरात प्रचंड दगडफेक, तोडफोड करण्यात आली. घरे, दुकानांसह मशिदीला लक्ष्य करत आंदोलकांनी हल्लाबोल केला. दुकाने, वाहनांसह काही घरांची जाळपोळ करण्याचाही प्रयत्न झाला. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. सकाळी सातपासून सुरू झालेले तोडफोड, दगडफेकीचे प्रकार दुपारी चारपर्यंत सुरूच होते. यामुळे परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.

कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत. विशाळगडाच्या पायथ्याला ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झालंय अशा नागरिकांची भेट घेऊन त्यांना मदत पोहोचवण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते या परिसरात जात आहेत. मात्र पोलिसांनी या सर्व नेत्यांना गडावर जाण्यापासून रोखले आहे. ज्यामुळे पांढरे पाणी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, विशाळगडावर जाण्यावर खासदार शाहू महाराज यांच्यासह बंटी पाटील ठाम आहेत. पोलिसांनी निदान 15 जणांना गडावर जाण्यास परवानगी द्यावी. जर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला थांबवलं तर नाईलाजस्थाव आम्हाला त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करावं लागेल असा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिलेला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img