नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि या पक्षाचं चिन्ह घड्याळ (Party And Symbol Hearing) याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली. निवडणूक आयोगाच्या या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी (NCP Hearing) पार पडली. यामध्ये अजित पवारांना (Ajit Pawar) दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. त्यामुळं आता नेमकं विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) तोंडावर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणार आहे.