21 C
New York

Leopard : ओतूरच्या पाथरटवाडीत बिबट्याची मादी जेरबंद

Published:

रमेश तांबे, ओतूर

ओतूर जवळील रहाटी पाथरटवाडी शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याची (Leopard) मादी जेरबंद झाल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

श्री काकडे हे माहिती देताना म्हणाले की,ओतूरच्या रहाटी पाथरटवाडी शिवरात बिबट्याचा वावर असल्याने, येथील शेतकरी  दत्तात्रय पानसरे यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात मंगळवार दि.१६ रोजी पहाटेच्या सुमारास  बिबट्याची मादी जेरबंद झाल्याची माहिती मंदा पानसरे यांनी वनविभागाला दिली.

सदर माहिती मिळताच ओतूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुधाकर गिते,वनरक्षक विश्वनाथ बेले, वनसेवक किसन केदार,गणपत केदार,फुलचंद खंडागळे, गंगाराम जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली,जेरबंद बिबट्याच्या मादीचे वय ७ वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. जेरबंद बिबट्याच्या मादीला ताब्यात घेऊन माणिकडोह बिबट निवरा केंद्रात सोडण्यात आले. सदर कामी येथील शेतकरी सुरेश पानसरे, रमेश गिते,संदीप पानसरे,बाबु घुले,विजय पानसरे, संपत पानसरे,सुनील गिते,बंडु चौरे, संतोष गिते, लक्ष्मण पानसरे  यांनी मदत केली

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img