26.6 C
New York

Jio Recharge: अनंत अंबानीच्या लग्नानिमित्त जिओ युजर्सना मिळणार 3 महिने फ्री रिचार्ज? जाणून घ्या खरं की खोटं

Published:

Jio Recharge: अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांनी १२ जुलै रोजी लग्नगाठ बांधली. हा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio World Convention Centre) पार पडला. या लग्नसोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अनंत आणि राधिकाच्या आशीर्वाद सोहळा देखील नुकताच पार पडला. आशीर्वाद सोहळा देखील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यालासुद्धा अनेक कलाकारांनी हजेरी लावलेली. आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा पार पडल्यानंतर एक मॅसेज सर्वत्र व्हायरल होत आहे. या दोघांच्या लग्नाच्या निमित्ताने JIO (Reliance Jio) वापरकर्त्यांना 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज देण्यात येणार आहे, असा दावा या मॅसेजमध्ये करण्यात आला आहे.

Jio Recharge: व्हायरल होत असणाऱ्या या मेसेजमध्ये म्हटलंय की, ’12 जुलै रोजी झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने, मुकेश अंबानी भारतामधल्या सर्व जिओ वापरकर्त्यांना 3 महिन्यांचा 799 रुपयांचा रिचार्ज मोफत देत आहेत. त्यामुळेच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या नंबरवर रिचार्ज करा. महा कॅशबॅक नावाची अज्ञात लिंकसुद्धा या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. पण, हा मेसेज खोटा असून दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. याबाबत खुद्द जिओने ही माहिती दिली आहे.

Jio Recharge: जिओ कंपनी वापरकर्त्यांना कोणताही मोफत रिचार्ज प्लॅन ऑफर करत नाही. त्यामुळे वापरकर्त्यांनी अशा प्रकारच्या मेसेजवर कृपा करून विश्वास ठेऊ नये. अशा मेसेजमूळे वापरकर्ते मोठ्या घोटाळ्यात अडकू शकतात. हा मेसेज पूर्णपणे खोटा असून अशी कोणतीच ऑफर कंपनीने सुरु केलेली नाहीये, असं JIO ने सांगितलं आहे.

कल्याण पूर्वेतील कचोरे टेकडीवरील दरड कोसळली

दिवसेंदिवस असे प्रकार घडतात आणि सर्वसामान्यांची फसवणूक होण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होते. लोकांपर्यंत अगदी खोटे मेसेज करून लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच तुमच्या घराचा वीज पुरवठा खंडित होणार आहे , असा मेसेज देशभरातल्या लोकांच्या फोनवर आला होता. यानंतर तुमचं गॅसचं कनेक्शन बंद होणार आहे, असा देखील मेसेज अनेकांच्या फोनवर आला. मेसेजमध्ये म्हंटल होत की, प्रिय ग्राहक. तुमच्या गॅसचं कनेक्शनचं बिल अपडेट झालेलं नाहीये, त्यामुळे तुमचं कनेक्शन तोडून टाकण्यात येणार आहे. अधिक माहिती हवी असल्यास दिलेल्या नंबरवर फोन करा.’

तर दुसरा मेसेज केलेला त्यात म्हंटल होत की, ‘प्रिय ग्राहक, आज रात्री ९.३० वाजता तुमच्या घराची वीज बंद केली जाणार आहे. लवकरात लवकर आमच्या विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.’ या मेसेजमुळे सर्वांचीच खळबळ उडाली होती. लोकांची फवसणूक करून त्यांच्यामध्ये दहशत पसरवण्यासाठी हा मेसेज पाठविण्यात आला असल्याचे समोर आलं होत. हा मेसेज पूर्ण खोटा असून नागरिकांनी ह्या मेसेजवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन शासनाने केलं होतं. त्यानंतर आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या निमित्ताने JIO वापरकर्त्यांना 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज देण्यात येणार असल्याचा मॅसेज सर्वत्र व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img