8.9 C
New York

Pooja Khedkar : पूजा खेडकरांची मसुरीत ‘परतवारी’; काऊंटडाऊन सुरू

Published:

मुंबई

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित (Training Period Recalled) करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाची कारवाई केलीय. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाकडून ही कारवाई करण्यात आलीय. अकादमीने महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले असून पूजा खेडकर यांना 23 जुलै पूर्वी मसूरी (Mussoorie) येथील अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

पुढील कारवाईसाठी कुठल्याही परिस्थितीत तत्काळ लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी येथे रिपोर्ट करा. 23 जुलैपूर्वी हजर व्हावेच लागेल, असे आदेशही खेडकर यांना दिले आहेत. राज्य सरकारने 11 जुलै रोजी दाखल केला सविस्तर अहवाल, त्यानंतर झालेली ही कारवाई करण्यात आली आहे. खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरण यामुळे प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचं समोर आलं. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसूरी येथील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली आहे. 

प्रोबेशन काळात एखाद्या ट्रेनी अधिकाऱ्यावर अशा प्रकारच्या कारवाईची ही देशाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांचं कुटुंब सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आयएएस होण्यासाठी पूजा खेडकर यांनी यूपीएससीची 11 वेळा परीक्षा दिली. ओबीसीतून परीक्षा देताना नॉन क्रिमीलेअरचा दाखला दिला. आता या दाखल्याची चौकशी जिल्हा महसूल प्रशासनाने सुरू केली आहे. याचदरम्यान, आता पूजा खेडकर यांना मोठा दणका मिळाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img