8 C
New York

Hardik Pandya: वडोदरामध्ये हार्दिक पांड्याचे भव्य स्वागत

Published:

निर्भयसिंह राणे

T20 विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) सहा डावात 48.00 च्या सरासरीने आणि 151.57 च्या स्ट्राईक रेटने 144 धावा केल्या आणि 11 बळी घेतले. त्याच्या T20 विश्वचषक विजयानंतर, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे सोमवारी त्याच्या मूळ शहरात, वडोदरा (Vadodara) येथे जंगी स्वागत करण्यात आले. T20 विश्वचषकात टीम इंडियाचा विजय साजरा करण्यासाठी हार्दिक रोड शोमध्येही सहभागी झाला.

T20 विश्वचषकात, हार्दिक पंड्याने सहा डावात 48.00 च्या सरासरीने आणि 151.57 च्या स्ट्राईक रेटने 144 धावा केल्या, अर्धशतक आणि 50* च्या सर्वोत्तम स्कोरसह. हार्दिकने आठ सामन्यांमध्ये 17.36 च्या सरासरीने आणि 7.64 च्या इकॉनॉमी रेटने 3/20 च्या सर्वोत्तम आकड्यांसह 11 बळी घेतले. रोड शो दरम्यान, वडोदरात हार्दिकचे जोरदार स्वागत कार्यांसाठी अनेक चाहते रस्त्यावर जमले होते. हार्दिकचा भाऊ कृणाल पंड्या (Krunal Pandya) देखील ह्या रोड शो मध्ये उपस्थित होता.

EURO 2024 : फ्रेंच फुटबॉलर ओलिव्हियर जिरुडने केली आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा

दुखापती आणि वादांचा सामना करत असताना, हार्दिकने पुन्हा एकदा आपल्या खेळातून दाखवून दिले आणि भारतीय क्रिकेट संघाच्या ICC T20 विश्वचषक विजयात महत्वाची भूमिका बजावली. हार्दिकनेच अंतिम सामन्यात 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हेनरिक क्लासनची महत्वपूर्ण विकेट मिळवली आणि निर्णायक अंतिम शटकात डेव्हिड मिलरची विकेट घेतली, ज्यामुळे खेळ पूर्णपणे भारताच्या बाजून वळला.

बार्बाडोस येथे झालेल्या फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय मिळवाल्याने भारताचा 11 वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपला कारण विराट कोहली (76), हार्दिक पंड्या (3/20) आणि जसप्रीत बुमराह (2/18). 29 जून रोजी विराटच्या मास्टरक्लास खेळीमुळे भारताला 20 ओव्हर्स मध्ये 176/7 ची मजल मारता अली, तर बुमराह आणि पंड्याने दक्षिण आफ्रिकेवर वेगवान मारा केला आणि सामना गमावलेल्या स्थितीतून हिसकावून घेतला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img