-1.8 C
New York

Govind Pansare : पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे यांचा जामीन रद्द

Published:

कोल्हापूर

काॅम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या खून प्रकरणी (Murder) प्रमुख संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे (Virendra Tawde) याचा जामीन कोल्हापूर सत्र न्यायालयानं (Kolhapur Sessions Court) रद्द केला आहे. तसंच तावडेला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दहशतवादविरोधी पथकाला (ATS) दिले आहेत. न्या. एस. एस. तांबे यांनी हे आदेश दिले.

2018 मध्ये तावडे याचा जामीन न्यायालयाने मंजूर केला होता. त्याच्या विरोधात विशेष सरकारी वकीलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टाने याचा निर्णय जिल्हा कोर्टातच करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार यावर सुनावणी सुरू होती. अखेर सरकरी वकीलांचे म्हणणे मान्य करत कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने तावडे याचा जामीन रद्द करत त्याला तत्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा देवी सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गोविंदे पानसरे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचा २० फेब्रुवारी २०१५ रोजी मृत्यू झाला. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्र तावडे याला १६ सप्टेंबर २०१५ रोजी अटक झाली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img