मुंबई
मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत (Tree Planting Campaign Scam) कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार न झाल्याचे समोर आले आहे. परिणामी 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट (Clean Cheat) देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांनी घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आता या प्रकरणाचा तपास करून कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे.
राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारने याबाबत आक्षेप घेत अनेक आरोप केले होते. त्यानुसार या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवालात सांगण्यात आले आहे. सोबतच राज्यात मोहिम यशस्वी झाल्याचेही समितीचे स्पष्ट मत आहे. मात्र आता या प्रकरणाचा तपास करून कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली असून या प्रकरणात कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नाही तसेच राज्यात ही मोहीम यशस्वी झाली मात्र राज्यात मोहिम राबवताना काही अडचणी व त्रुटी राहिले असं या समितीने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. राज्यात या मोहिमेमुळे 52 कोटी वृक्षांची लागवड झाली असल्याचे देखील या अहवालात समितीने म्हटले आहे.