5.5 C
New York

Bigg Boss OTT 3: ‘मी पुन्हा वडा पाव विकेन’, चंद्रिका शोमधून बाहेर पडताच म्हणाली, माझं अस्तित्व…

Published:

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’ (Bigg Boss OTT 3) हा शो सध्या जोरदार चर्चेत आहे. नेहमीच्या एपिसोडमधून बिग बॉस ओटीटीला चांगलीच पसंती मिळतेय. घरातील सर्वच स्पर्धक हटके कंटेन्ट देत बाहेर वाहवा मिळवत आहेत. बिग बॉसच्या घरात सर्वात जास्त चर्चेत आली ती म्हणजे ‘वडापाव गर्ल’ अशी ओळख असलेली चंद्रिका दीक्षित. चंद्रिका दीक्षितला गेल्या काही दिवसांपूर्वी Bigg Boss OTT 3 मधून बाहेरचा रस्ता गाठावा लागला. दिलेल्या मुलाखतीत चंद्रिकाने Bigg Boss OTT 3 बाहेर पडल्यावर पुन्हा ती वडापाव विकणार की नाही? याचा खुलासा तिने केला आहे.

’बिग बॉस’च्या घरात कोकणातील ‘या’ सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरची एट्री

Bigg Boss OTT 3 मधून एक्सिट घेताच चंद्रिका पुन्हा स्टॉलवर?
Bigg Boss OTT 3: चंद्रिकाने दिलेल्या मुलाखतीत, चंद्रिका पुन्हा दिल्लीच्या स्टॉलवर वडापाव विकणार का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर चंद्रिकाने उत्तर दिलं की, “वडापाव विकणं हीच माझी ओळख आहे. वडापाव विकणं हे मी माझं अस्तित्व मानते. ज्यावेळी मला नोकरीतून काढण्यात आलेलं तेव्हा मी वडापाव विकूणचं माझी स्वतःची एक ओळख बनवली. त्यामुळे मी हे काम कधीच सोडणार नाही, चालूच ठेवेन.”

माझी इमेज बदललीय: चंद्रिका दीक्षित
Bigg Boss OTT 3: मुलाखतीत चंद्रिका पुढे म्हणाली की, “बिग बॉस मध्ये गेल्याने माझी इमेज बदलण्यात मी यशस्वी झाली आहे. लोकांना सारखं हेच वाटायचं की मी सतत भांडणंच करते. पण आता काही लोकांना कळालं असेल की, मी खूप प्रेमळही आहे आणि काळजीही घेते. घरामध्ये मला पॉलोमीने सांगितलं होतं की, आपण खरे कोण आहोत हे दुनियेला कळालं पाहिजे. रणवीर शौरी आणि साई केतन राव यांचंसुद्धा माझ्याबद्धलच मतं बदललं. यासाठीचं मी स्वतःला पहिल्यापासूनच विजेती समजते.” वडापाव गर्ल २४ दिवस घरात राहिल्यानंतर ‘बिग बॉस ओटीटी ३’मधला तिचा प्रवास संपून ती एव्हिक्ट झाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img